निवडणूक मंचावर भजनाला जात नाही, योगी आदित्यनाथ यांचे निवडणूक आयोगाला उत्तर

आपल्या विरोधकाला घेरण्यासाठी आणि त्याला समूळ नष्ट करण्यासाठी आम्ही मंचावर जातो असेही त्यांनी स्पष्ट केले. 

Updated: May 4, 2019, 09:15 AM IST
निवडणूक मंचावर भजनाला जात नाही, योगी आदित्यनाथ यांचे निवडणूक आयोगाला उत्तर  title=

नवी दिल्ली : भारतीय जनता पार्टीचे स्टार प्रचारक आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी निवडणूक आयोगाच्या नोटीशीला उत्तर दिले आहे. पार्टीचा उमेदवार म्हणून आम्ही जेव्हा प्रचार सभा घेतो तेव्हा आम्हाला जनतेला संबोधित करायचे असते. आम्ही तिथे कोणते भजन करायला जातो का ? असा प्रश्न योगी आदित्यनाथ यांनी उपस्थित केला. आमचा आणि जनतेतील संवाद वेगळा करणे हे आचार संहितेमध्ये येत नाही. कोणत्या पुस्तकात लिहिलेली किंवा बोलली गेलेली गोष्ट देखील मी बोलू शकत नाही तर मग प्रचारात आम्ही काय बोलणार ? निवडणुकीच्या मंचावर आम्ही भजन करायला जातो का ? आपल्या विरोधकाला घेरण्यासाठी आणि त्याला समूळ नष्ट करण्यासाठी आम्ही मंचावर जातो असेही त्यांनी स्पष्ट केले. 

वादग्रस्त वक्तव्याबद्दल उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना निवडणूक आयोगाने नोटीस बजावली आहे. तसेच त्यांच्या प्रचारावर 72 तास बंदी देखील आणण्यात आली होती. योगी आदित्यनाथ यांनी समाजवादी आणि बहुजन समाज पार्टीच्या उमेदवाराचा 'बाबर की औलाद' असा उल्लेख केला होता. संभल येथील प्रचार सभेत शफीकुर्रहमान बर्क यांना उद्देशून हा शब्दप्रयोग केला होता.

सपा-बसपाच्या गठबंधनने निवडणूक आयोगाकडे यासंदर्भात तक्रार केली होती. यानंतर निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना 24 तासाच्या आत उत्तर देण्यास सांगितले होते. शुक्रवारी योगींनी या नोटीसला उत्तर दिले. याआधी आयोगाने त्यांच्या प्रचारावर 72 तासांची बंदी घातली होती.