उत्‍तर प्रदेश : कैराना-नुरपूरमध्ये कोण मारणार बाजी, आज होणार फैसला

 कैराना लोकसभा आणि नुरपूर विधानसभा मतदार संघात पोटनिवडणूक झाली. या पोटनिवडणुकीचा निकाल आज लागणार आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: May 31, 2018, 08:14 AM IST
उत्‍तर प्रदेश : कैराना-नुरपूरमध्ये कोण मारणार बाजी, आज होणार फैसला title=

लखनऊ : येथील कैराना लोकसभा आणि नुरपूर विधानसभा मतदार संघात पोटनिवडणूक झाली. या पोटनिवडणुकीचा निकाल आज लागणार असून सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. कैराना लोकसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी सहानपूर आणि शामली येथे होणार आहे. तर नुरपूर विधानसभेची मतमोजणी बिजनौर येथे होणार आहे. दुपारी १ वाजेपर्यंत निवडणुकीचे निकाल हाती येतील. कैराना ही जागा भाजपकडे आहे. येथे राष्ट्रील लोक दल, काँग्रेस, समाजवादी पार्टी आणि बहुजन समाजवादी पार्टी यांच्या आघाडीत ही निवडणूक झाली. पुढील वर्षी २०१९ मध्ये होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या निडणुकीला महत्वा प्राप्त झालेय.

कैरानात मृगांका सिंग-तबस्सूम हसन यांच्यात टक्कर

कैराना लोकसभा मतदार संघात भाजपकडून मृगांका सिंग तर राष्ट्रीय लोकदलकडून तबस्सूम हसन निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या जागेसाठी एकूण १२ उमेदवार रिंगणात आहेत. भाजपचे खासदार हुकुम सिंग यांच्या निधनानंतर या ठिकाणी पोटनिवडणूक लागली होती. भाजपने या जागी त्यांची मुलगी मृगांका सिंग हिला निवडणुकीसाठी उतरवलेय.

नुरपूर येथे भाजप विरुद्ध समाजवादी पार्टी

नुरपूर विधानसभा निवडणुकीत भाजपच्या अवनी सिंग आणि समाजवादी पार्टीच्या नईमुल हसन यांच्यात सामना होत आहे. या ठिकाणी एकूण १० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. बिजनौर जिल्ह्यातील नुरपूर विधानसभा निडणूक ही आमदार लोकेंद्र सिंग यांच्या निधनानंतर जाहीर झाली होती. त्यामुळे ही निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे लक्ष लागलेय.

कैराना लोकसभा पोटनिवडणुकीत ६१ टक्के मतदान झाले. तर ७३ केंद्रांवर फेरमतदान घेण्यात आले होते. या ठिकाणी मतदान यंत्रात बिघाड झाल्याने हे मतदान घेण्यात आले.