LIC ची करोडो ग्राहकांसाठी ही खास सुविधा, लगेच फोनमध्ये हा नंबर करा सेव्ह

LIC Policy Latest News: कोट्यवधी LIC ग्राहकांसाठी एक चांगली बातमी आहे. तुम्ही LIC ची पॉलिसी घेतली असेल तर खास सुविधा दिली जाईल. या सुविधेद्वारे आता तुम्ही घरी बसून अनेक सुविधांचा लाभ घेऊ शकता.

Updated: Dec 3, 2022, 09:18 AM IST
LIC ची करोडो ग्राहकांसाठी ही खास सुविधा, लगेच फोनमध्ये हा नंबर करा सेव्ह  title=
LIC Whatsapp Services GS

LIC Policy Status: एलआयसीने ( LIC) आपल्या ग्राहकांसाठी गुडन्यूज दिली आहे. तुम्ही LIC ची पॉलिसी घेतली असेल तर आता तुम्हाला कंपनीकडून ही विशेष सुविधा मिळणार आहे. भारतीय आयुर्विमा महामंडळाने (LIC) आपल्या ग्राहकांसाठी Whatsapp सेवा सुरू केली आहे. या सुविधेद्वारे आता तुम्ही घरी बसून अनेक सुविधांचा लाभ घेऊ शकता. (LIC Whatsapp Services) 

LIC च्या अध्यक्षांनी दिली ही माहिती

एलआयसी ऑफ इंडियाचे अध्यक्ष एम.आर. कुमार यांनी सांगितले की, LIC पॉलिसीधारक आता फक्त त्यांच्या व्हॉट्सअ‍ॅपवर (Whatsapp) अनेक सेवांचा लाभ घेऊ शकतील. कंपनीने अनेक संवादात्मक सेवा सुरु केल्या आहेत. या सुविधेमुळे तुम्ही तुमच्या फोनवरच अनेक सुविधांचा लाभ घेऊ शकाल. 

 हा नंबर करा फोनमध्ये सेव्ह 

ज्या ग्राहकांनी त्यांची पॉलिसी LIC पोर्टलवर नोंदवली आहे त्यांनाच या सुविधेचा लाभ मिळेल. ग्राहकांना या फोन नंबर 8976862090 वर फक्त हाय पाठवायचे आहे. यानंतर, तुम्हाला पॉलिसी सेवांशी संबंधित सर्व माहिती घरी बसून मिळेल. 

या सुविधा LIC Whatsapp वर उपलब्ध असतील

- तुम्हाला तुमच्या पॉलिसीच्या प्रीमियम आणि बोनसच्या देय तारखेशी संबंधित सर्व माहिती मिळेल. 
- तुम्ही युलिप पॉलिसीच्या युनिट्सचे स्टेटमेंट देखील पाहू शकाल. 
- याशिवाय कर्जाची पात्रता आणि हप्त्यांशी संबंधित सर्व माहिती उपलब्ध असेल. 
- पॉलिसी प्रीमियम पॅड प्रमाणपत्राबाबतही तपशील मिळतील. 
- यासोबतच तुम्हाला एलआयसी सर्व्हिस लिंकसारख्या अनेक सुविधांचा लाभ घेता येणार आहे. 

अन्यथा पोर्टलवर नोंदणी करावी लागेल

एलआयसी पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी आणि सुविधांचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला एलआयसीच्या वेबसाइटला भेट द्यावी लागेल. येथे तुम्हाला तुमचा पॉलिसी क्रमांक आणि इतर महत्त्वाचे तपशील भरावे लागतील. ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅप सुविधेचा लाभही घेता येणार आहे. यासोबतच तुम्हाला विमा पॉलिसीशी संबंधित सर्व माहितीही मिळेल.