LIC Policy धारकांसाठी सर्वात मोठी बातमी!

LIC Policy Link With Pan:जर तुम्ही पॉलिसीधारक असाल आणि अद्यापही तुम्ही पॅन कार्ड एलआयसीशी लिंक (LIC Policy Link With Pan) केले नसेल तर तुम्हाला मोठा दंड होऊ शकतो. एलआयसीकडून याबाबत अधिसूचनाही जारी करण्यात आली आहे. तसेच 31 मार्च 2023 ची मुदत देखील देण्यात आली आहे. 

Updated: Feb 20, 2023, 01:35 PM IST
LIC Policy धारकांसाठी सर्वात मोठी बातमी! title=

LIC Policy Link With Pan:देशभरात एलआयसीचे (LIC Policy)करोडो ग्राहक आहेत. या करोडो ग्राहकांसाठी आता मोठी बातमी समोर आली आहे. ग्राहकांना एलआयसीकडून (LIC)अलर्ट जारी करण्यात आला आहे. या अलर्टनुसार जर तुम्ही पॉलिसीधारक असाल तर तुम्हाला 31 मार्च 2023 पुर्वी पॅन कार्ड  (Pan card)पॉलिसीशी लिंक करावे लागणार आहे.जर तुम्ही ते नाही केलेत, तर तुम्हाला मोठे नुकसान होऊ शकते. त्यामुळे 31 मार्चची वाट न पाहता आताच पॅन एलआयसीशी लिंक (LIC Policy Link With Pan) करून घ्या जेणेकरून तुमची चिंता मिटेल. 

31 मार्च पर्यंत लिंक करा 

जर तुम्ही पॉलिसीधारक असाल आणि अद्यापही तुम्ही पॅन कार्ड एलआयसीशी लिंक (LIC Policy Link With Pan) केले नसेल तर तुम्हाला मोठा दंड होऊ शकतो. एलआयसीकडून याबाबत अधिसूचनाही जारी करण्यात आली आहे. तसेच 31 मार्च 2023 ची मुदत देखील देण्यात आली आहे. या मुदतीआधी लिंक न केल्यास मोठा दंड सहन करावा लागणार आहे. 

असे लिंक करा...

  • एलआयसी इंडियाच्या अधिकृत WebSite वर जा.
  • तुम्हाला पॉलिसी पॅन स्टेटस (Get Policy Pan Status)मिळेल 
  • (linkpan.licindia.in/UIDSeedingWebApp/getPolicyPANStatus)वर क्लिक करावे लागेल.  
  • आता तुम्ही LIC पॉलिसीशी PAN लिंक करू शकता.
  • तुम्हाला लिंक झाल्याचे स्टेटसही पाहता येणार आहे. 
  • आता एक नवीन पेज उघडेल आणि येथे तुम्हाला तुमचा पॉलिसी नंबर टाकावा लागेल.
  • तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती भरावी लागेल.
  • आता पॅन कार्डचा तपशील भरा आणि त्यानंतर Captcha भरा.
  • आता तुमच्या स्क्रीनवर LIC पॅन कार्डशी लिंक केल्याचा तपशील दिसेल.

असे पाहा लिंक स्टेटस 

तुम्हाला पॅन लिंक केल्यानंतर त्याच स्टेटस जाणून घ्यायचे असेल तर तुम्ही https://www.licindia.in/ वर जाऊन येथे नोंदणी करून तुमची स्थिती जाणून घेऊ शकता.

दरम्यान जर तुम्ही पॅन कार्ड एलआयसी पॉलिसीशी लिंक (LIC Policy Link With Pan) केलेले नसेल, तर तुम्हाला कोणत्याही योजनेचा लाभ मिळू शकणार नाही. यासोबतच पॉलिसीशी संबंधित समस्यांनाही सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे आता 31 मार्चची वाट न पाहता आताच लिंक करून घ्या.