रोजचा खाण्याचा खर्च कमी करुन फक्त 'इतके' गुंतवा, मॅच्युरिटीवर मिळेल 54 लाखांची रक्कम

LIC Jeevan Labh: ही पॉलिसी 8 ते 59 वयोगटातील व्यक्तींसाठी उपलब्ध आहे. उदाहरणार्थ, 25 वर्षांच्या व्यक्तीने जीवन लाभ पॉलिसी घेतल्यास, त्याला मासिक गुंतवणूक म्हणून 7,572 रुपये किंवा दररोजा 252 रुपये द्यावे लागतील. 

Pravin Dabholkar | Updated: Aug 8, 2023, 03:12 PM IST
रोजचा खाण्याचा खर्च कमी करुन फक्त 'इतके' गुंतवा, मॅच्युरिटीवर मिळेल 54 लाखांची रक्कम title=

LIC Jeevan Labh: देशाच्या कानाकोपऱ्यात  राहणाऱ्या नागरिकांना एलआयसीवर विश्वास आहे. इतर खासगी गुंतवणूक स्किमच्या तुलनेत एलआयसीमध्ये कमी परतावा मिळतो. एलआयसीमध्ये खात्रीशीर रिटर्न्स मिळतात, या विश्वासाने गुंतवणूक केली जाते. या एलआयसीने अशीच एक ऑफर गुंतवणूकदारांसाठी आणली आहे. ज्यामध्ये तुम्ही रोजते 252 रुपये गुंतवलात तर तुम्हाला मॅच्युरिटीवेळी 54 लाख रुपये मिळणार आहेत. या स्किमबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 

एलआयसी जीवन लाभ पॉलिसीमध्ये संरक्षण आणि बचत दोन्ही होते. मासिक 7,572 रुपयांची बचत केलात तर तुम्हाला भविष्यात 54 लाख रुपयांचा रक्कम मिळू शकते. 
ही मर्यादित प्रीमियम आणि नॉन-लिंक्ड योजना आहे. याअंतर्गत पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास कुटुंबालाआर्थिक सहाय्य करते. यासोबतच तुम्ही रक्कम मॅच्योरिटी होईपर्यंत टिकून राहिल्यास भरपूर परतावा मिळतो. 

ही पॉलिसी 8 ते 59 वयोगटातील व्यक्तींसाठी उपलब्ध आहे. उदाहरणार्थ, 25 वर्षांच्या व्यक्तीने जीवन लाभ पॉलिसी घेतल्यास, त्याला मासिक गुंतवणूक म्हणून 7,572 रुपये किंवा दररोजा 252 रुपये द्यावे लागतील. 

हिंदुस्तान एरोनॉटिक्समध्ये 'शिका आणि कमवा'; डिप्लोमा, ITI उत्तीर्णांनी 'येथे' पाठवा अर्ज

मुदतपूर्तीनंतर या योजनेत 54 लाख रुपये मिळू शकतात. एलआयसीच्या लाइफ बेनिफिटमध्ये मॅच्युरिटीवर रिव्हर्शनरी बोनस आणि अंतिम अतिरिक्त बोनस यांचा समावेश होतो.

LIC जीवन लाभ पॉलिसी बहुमुखी आहे. यामध्ये 8 ते 59 वयोगटातील नागरिकांना गुंतवणूक करण्याची मुभा आहे. यामध्ये 10, 13 किंवा 16 वर्षांसाठी गुंतवणूक केली जाऊ शकते. ज्यांचा परिपक्वता कालावधी 16 ते 25 वर्षे आहे. 

59 वर्षीय व्यक्ती 75 वर्षांपर्यंतचे कव्हरेज सुनिश्चित करण्यासाठी 16 वर्षांची पॉलिसी निवडू शकते. मुदतीदरम्यान पॉलिसीधारकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास, नॉमिनीला बोनस आणि विमा रकमेसह फायदे मिळतात. सर्वसमावेशक मृत्यूचा लाभ हे या पॉलिसिचे वैशिष्ट्य आहे.

BMC Job: मुंबई पालिकेत नवीन भरती; पदवीधरांना 1 लाखापर्यंत मिळेल पगार

सेंट्रल बँक ऑफ इंडियात भरती 

सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत फॅकल्टी, ऑफिस असिस्टंट, वॉचमन कम गार्डनर आणि अटेंडरचे प्रत्येकी 1 पद भरले जाणार आहेत. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी पात्रता, वयोमर्यादा, पगार, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडिया यवतमाळ ब्रांचसाठी ही भरती केली जाणार आहे.

इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज  क्षेत्रीय प्रमुख, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, पहिला मजला, प्लॅटिनम एम्पायर बिल्डिंग, तेओसा जिन समोर, अमरावती 444601 या पत्त्यावर पाठवायचे आहेत. 17 ऑगस्ट 2023 ही अर्जाची शेवटची तारीख आहे.