Karnataka Leopard : किंकाळ्या, पळापळ आणि...; पिसाळलेल्या बिबट्याला पाहून नागरिक सैरभैर!

Leopard attacks on biker : म्हैसूरमधील केआर नगरमधील ही घटना आहे. त्याचा व्हिडिओ (Caught on camera) देखील समोर आलाय. ज्यामध्ये कॉलनीत बांधलेल्या घरांसमोर बिबट्या...

Updated: Nov 4, 2022, 04:27 PM IST
Karnataka Leopard : किंकाळ्या, पळापळ आणि...; पिसाळलेल्या बिबट्याला पाहून नागरिक सैरभैर! title=
Karnataka Leopard attacks

Karnataka Leopard attacks : हिरवंगार जंगल सोडून काँक्रिटच्या जंगलात म्हणजेच मानवी वस्तीत बिबट्या धुसल्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. असाच धक्कादायक प्रकार कर्नाटकातील म्हैसूर (Karnataka's Mysuru) शहरातून समोर आला आहे. त्यानंतर मोठा गोंधळ उडाल्याचं पहायला मिळालं आहे. पिसाळलेल्या बिबट्याने मोठा गोंधळ घातल्याचं निदर्शनास आलंय. त्यामुळे लोकांना घराबाहेर पडताना देखील भिती वाटत आहे.

म्हैसूरमधील केआर नगरमधील ही घटना आहे. त्याचा व्हिडिओ (Caught on camera) देखील समोर आलाय. ज्यामध्ये कॉलनीत बांधलेल्या घरांसमोर बिबट्या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी उड्या मारताना दिसत आहे. त्याचवेळी लोक आपला जीव वाचवण्यासाठी घरात कैद झालेलेत. अनेक नागरिकांनी आपल्या छतावर या बिबट्याला पाहिलं होतं.

आणखी वाचा - धावती ट्रेन पकडताना तरुणाचा तोल गेला आणि...पाहा धक्कादायक VIDEO

शुक्रवारी सकाळची केआर नगरमध्ये (KR nagar) धक्कादायक घटना घडली. बाहेर दिसणाऱ्या अनेक लोकांवर बिबट्यानं हल्ला केलाय. बिबट्या घराच्या भिंतीवरून खाली उडी मारून मोटारसायकलवरून जात असलेल्या व्यक्तीवर हल्ला केला, त्याचा व्हिडीओ देखील समोर आलाय. यानंतर त्याला हाकलण्यासाठी त्याच्यावर दगडफेक करण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीवरही बिबट्याने हल्ला केला आणि तो जमिनीवर पडून जखमी झाला.

पाहा व्हिडीओ-  

दरम्यान, बिबट्याची माहिती मिळताच वनविभागाच्या (Forest Department) पथकानं घटनास्थळी पोहोचून मोठ्या शर्थीनं त्याला पकडलं. वनविभागाच्या म्हणण्यानुसार, बिबट्याला पाहताच लोकांनी त्याच्यावर हल्ला करण्यास सुरुवात केली, त्यानंतर तो आक्रमक झाला. मात्र, आता बिबट्याला पकडल्यामुळं अनेकांनी सुटकेचा श्वास घेतला आहे