Extra Marital Affair : भारतात एक विचित्र घटना समोर आली आहे. मुलगा परदेशात असताना सूनेच्या कृत्याने सासरच्यांना धक्का बसलाय. नवरा बायकोमधील नातं प्रेम, विश्वासावर अवलंबून असतं. त्यातील एकानेही या नात्यामध्ये विश्वासघात केल्यास त्या नात्याला तडा जातो. अशीच एक घटना गोरखपूरच्या गुलरीहा भागात एका गावात उघडकीस आली आहे. सासू सासऱ्यांनी सूनेला प्रियकरांसोबत आक्षेपार्ह अवस्थेत पडकलंय. नवरा परदेशात असल्याने घरात सासू सासरे झोपल्यानंतर सूनेने मध्यरात्री आपल्या प्रियकराला बोलावलं.
त्यानंतर अचानक सासू सासरेंना मध्यरात्री सुनेच्या खोलीतून आवाज ऐकू यायला लागला. आपला मुलगा परदेशात गेलाय मग सूनेच्या खोलीतून मध्यरात्री आवाज कसा? असा प्रश्न त्यांना पडला. त्यांनी सूनेच्या खोलीचा दरवाजा वाजवला त्यानंतर समोरच दृष्यं पाहून त्यांचा राग अनावर झाला. सूनेच्या खोलीत प्रियकर पाहून त्यांनी त्या तरुणाला मारहाण केली आणि 112 नंबर डायल करून पोलिसांना माहिती झालेल्या घटनेची माहिती दिली.
कुशीनगर जिल्ह्यातील कास्या भागातील एका तरुणीचे दीड वर्षांपूर्वी गुलरीहामधील तरुणाशी लग्न झालं होतं. लग्नानंतर दोन महिन्यांनी मुलीचा पती नोकरीसाठी परदेशात गेला. लग्नापूर्वी तरुणीचं शहरातील एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते, अशी माहिती मिळाली आहे. गुरुवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास सुनेच्या खोलीतून आवाज ऐकून सासऱ्यांनी दार ठोठावण्यास सुरुवात केली. दरवाजा उघडला असता प्रियकर खोलीत दिसून आला. हे पाहून तरुणाला मारहाण केल्यानंतर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं. पोलिसांसमोर प्रेमी युगुल एकमेकांसोबत राहण्याबाबत विनंती करत होते.
पण स्टोरीमध्ये ट्वीस्ट आलं, जेव्हा शुक्रवारी सकाळी प्रेयसीसोबत राहण्यावर प्रियकरांने मौन बाळगलं. विवाहित महिलेचा आरोप आहे की, तिचा प्रियकर लग्नानंतर भेटण्यासाठी तिच्यावर दबाव टाकत होता. गुरुवारी रात्री तो आपल्या दोन मित्रांसह कुशीनगर जिल्ह्यातून निघून सेमरा क्रमांक एक इथे सासरच्या घरी पोहोचला. त्याचे दोन्ही मित्र निघून गेले. यानंतर प्रियकराने सासरच्या घराबाहेरून फोन करून गोंधळ घालण्याची धमकी देण्यास सुरुवात केली. तिने त्याला समजून घेण्यासाठी खोलीत बोलावलं होतं.
दरम्यान सासरची मंडळी आता सुनेला घरात ठेवायला तयार नाहीत. गुलरीहा प्रभारी शशी भूषण राय यांनी सांगितलं की, हे जोडपे प्रौढ असून दोन्ही बाजूंच्या कुटुंबीयांना बोलवण्यात आले आहे. कुटुंबाशी संवाद साधून यावर निर्णय घेण्यात येईल.