Petrol-Diesel च्या दराबाबत नवीन अपडेट, पाहा तुमच्या शहरातील आजचे दर

Petrol and Diesel Rate :  देशातील तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या नवीनतम किंमती जाहीर केल्या आहेत. त्यानुसार पेट्रोल आणि डिझेलच्या दराबाबत नवीन अपडेट समोर आली आहे. जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर...

श्वेता चव्हाण | Updated: May 10, 2023, 10:10 AM IST
Petrol-Diesel च्या दराबाबत नवीन अपडेट, पाहा तुमच्या शहरातील आजचे दर  title=
Petrol Diesel Price on 10 May 2023

Petrol Diesel Price on 10 May 2023 : आंतरराष्ट्रीय बाजारत कच्चा तेलाच्या किंमती आज अपडेट झाल्या असून ब्रेंट क्रुड 77.25 डॉलरने विकले जाणार आहे.  देशातील तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या नवीनतम किंमती जाहीर केल्या आहेत. 10 मे रोजीही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. आज पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol and Diesel Rate) स्थिर आहेत. जर तुम्ही गाडीत पेट्रोल भरणार असाल तर जाणून घ्या 1 लिटर पेट्रोल किंवा डिझेलसाठी तुम्हाला किती पैसे मोजावे लागतील?

गेल्या वर्षभरापासून देशातील तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात (Petrol and Diesel Pric) कोणताही बदल केला नाही. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात शेवटचा बदल हा 22 मे रोजी करण्यात आला होता. मात्र त्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, जम्मू-काश्मीर आणि छत्तीसगडमध्ये आज (10 मे) पेट्रोल-डिझेलच्या दरात घसरण पाहायला मिळत आहे. त्याचवेळी हिमाचलमध्ये पेट्रोल 68 पैशांनी तर डिझेल 60 पैशांनी महागले आहे. याशिवाय झारखंड आणि कर्नाटकमध्येही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. तर उत्तर प्रदेशात पेट्रोल 28 पैशांनी तर डिझेल 27 पैशांनी स्वस्त झाले आहे. पश्चिम बंगालमध्ये पेट्रोल 46 पैशांनी तर डिझेल 43 पैशांनी कमी झाले आहे. बिहारमध्येही पेट्रोलच्या दरात 49 पैशांची घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. 

तर आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईत (Mumbai Petrol Rate) पेट्रोल 106.31 रुपये तर डिझेल 94.27 रुपये प्रति लीटरने विकले जाणार आहे. तेच दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लीटर रुपये असणार आहे. त्याचबरोबर कोलकातामध्ये पेट्रोल 106 रुपये पेट्रोल तर 92.76 रुपये डिझेल विकेल जाणार आहे. तर चेन्नईत पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लीटर  आजचे दर असणार आहेत.  

जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर सहजरित्या जाणून घेऊ शकता. यासाठी तुम्हाला तेल विपणन कंपन्यांच्या वेबसाइटला भेट देऊन त्यावर एसएमएस पाठवावा लागेल. तुम्ही जर इंडियन ऑइलचे ग्राहक असाल तर 9224992249 वर RSP शहर कोड पाठवू शकता. तसेच BPCL ग्राहक असल्यास RSP लिहून 9223112222 वर एसएमएस पाठवू शकता, असे केल्यानंतर घरबसल्या तुम्हाला पेट्रोल आणि डिझेलचे लेटेस्ट दर समजू शकतात.