मुख्यमंत्री असताना बहिणीच्या घरातून चालायचे लालूंचे सत्ताकेंद्र

लालूंना झालेल्या शिक्षेचे वृत्त ऐकून त्यांना धक्का बसला होता. न्यायालयाने शिक्षा ठोठावताच दुसऱ्याच दिवशी लालूंच्या बहिणीचे निधन झाले.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Jan 7, 2018, 06:56 PM IST
मुख्यमंत्री असताना बहिणीच्या घरातून चालायचे लालूंचे सत्ताकेंद्र title=

नवी दिल्ली : चारा घोटाळाप्रकरणी तुरूंगात शिक्षा भोगत असलेल्या लालूप्रसाद यादव यांच्या बहिणीचे निधन झाले आहे. लालूंना झालेल्या शिक्षेचे वृत्त ऐकून त्यांना धक्का बसला होता. न्यायालयाने शिक्षा ठोठावताच दुसऱ्याच दिवशी लालूंच्या बहिणीचे निधन झाले. मुख्यमंत्री असताना सुरूवातीच्या काळात लालू प्रसाद याच बहिणीच्या घरातून सत्ताकेंद्र चलवत होते.

बहिणीच्या घरात लालूंचे कार्यालय

गंगोत्रीदेवी असे लालूंच्या बहिणीचे नाव आहे. त्या पटना येथील व्हेटरनरी कॉलेजच्या सर्वंट क्वार्टरमध्ये राहात होत्या. १९९० मध्ये मुख्यमंत्री झाल्यावर लालूंनी सहा महिने सरकार चालवले. दरम्यानच्या काळात लालूंनी याच क्वार्टरमधून सरकार चालवले होते. यादव कुटुंबियांच्या वर्तुळातील लोक सांगतात की, गायत्री देवी यांना लालूंबद्धल विशेष प्रेम होते. लालूंसह सहा भावांमध्ये गायत्रीदेवी ही एकटीच बहिण होती. गायत्री देवी यांना तिन मुले आहेत. त्यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे. तर, इतर दोन मुलांपैकी एक बिहार पोलिस तर, दुसरा रेल्वेत नोकरी करतो. 

भावासाठी बहिणीने केला देवाचा धावा

गायत्री देवी यांचे पुत्र  बॅलिस्टर यादव यांनी सांगितले की, भावाला (लालूप्रसाद यादव) झालेल्या शिक्षेच्या धक्क्याने तिचा मृत्यू झाला. शिक्षा ठोठावली जाण्याच्या दिवशी ती संपूर्ण दिवस ईश्वराची प्रार्थना करत होती. तसेच, तिने अनेक वेळा माझ्याकडे आग्रह धरला होता की, मला लालूंसोबत बोलू देत. मात्र, बोलणे होऊ शकले नाही.

दरम्यान, गायत्री देवी यांच्या निधनाचे वृत्त समजताच लालूंची पत्नी राबडीदेवी आणि पूत्र तेजस्वी आणि तेज प्रताप यादव त्यांच्या घरी पोहोचले.