Lakhimpur Kheri Violence: लोकशाहीत आवाज उठवणाऱ्यांची नाकेबंदी - संजय राऊत

नवी दिल्ली : Lakhimpur Kheri Violence: ज्या देशाने दीड वर्षे गुलामगिरी सहन केली. त्या देशात न्यायासाठी आवाज उठवणाऱ्या शेतकऱ्यांना चिरडून मारले जात आहे. शेतकऱ्यांना लखीमपूर खेरी घटनेविषयी चिंता वाटतेय, असे प्रतिवादन शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केले आहे. लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणी राहुल गांधी यांची राऊत यांनी काल भेट घेतली. या पार्श्वभूमीवर आज ते माध्यमांशी बोलत होते.

काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांना लखीमपूर खेरी येथे पीडीत कुटुंबीयांना भेटण्यासाठी जाऊ दिले जाणार नाही. ही लोकशाहीत आवाज उठवणाऱ्यांची नाकेबंदी केली जात आहे. सरकार विरोधी बोलणाऱ्यांना देशद्रोही ठरवले जात आहे. देशात नवी गुलामगिरीची सुरूवात झाली आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
 
शेतकऱ्यांना लखीमपूर खेरी घटनेविषयी चिंता वाटत आहे. देशात न्यायासाठी आवाज उठवणाऱ्या शेतकऱ्यांना असे चिरडने हे योग्य नाही. याप्रकरणी सरकारकडून कोणतीही अधिकृत भूमिका आलेली नाही. सरकारला संवेदना नाहीत का, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला. आजही हे प्रकरण दाबण्यासाठी हालचाली सुरू आहेत. सरकारी यंत्रणेचा वापर करून पडदा टाकण्याचा प्रयत्न होत आहे, असा थेट आरोप राऊत यांनी यावेळी केला.

विरोधक राजकारण करताहेत अशी भूमिका सरकार तर्फे घेतली गेली आहे. यात कुठले राजकारण आले आहे. हे विरोधकांचे कर्तव्य आहे, असे राऊत म्हणाले. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी या तुरूंगात आहेत. त्यांच्या समर्थनार्थ उत्तर प्रदेशमध्ये मशाल निघाली आहे. जिथे काँग्रेसचे अस्तित्व संपले होतं तिथे प्रियंका गांधी यांच्यासाठी लोक जागे झाले आहेत. आता तर काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना जाऊ दिले जाणार नाही. हा लोकशाहीत आवाज उठवणाऱ्यांची नाकेबंदी आहे, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला आहे.

देशद्रोही सरकार विरोधी ठरवले जात आहे. देशात नवी गुलामगिरीची सुरूवात झाली आहे. विरोधकांनी एकत्र येऊन काम करायला पाहिजे. लोकशाहीत विरोधकांचा आवाज दाबला जात आहे. हे योग्य नाही, असे संजय राऊत म्हणाले.

English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
Lakhimpur Kheri Violence: Blockade of those who raise voice in democracy - Sanjay Raut
News Source: 
Home Title: 

लखीमपूर खेरी घटना : लोकशाहीत आवाज उठवणाऱ्यांची नाकेबंदी - संजय राऊत

Lakhimpur Kheri Violence: लोकशाहीत आवाज उठवणाऱ्यांची नाकेबंदी - संजय राऊत
Caption: 
संग्रहित छाया
Yes
No
Section: 
Facebook Instant Article: 
Yes
Mobile Title: 
लखीमपूर खेरी घटना : लोकशाहीत आवाज उठवणाऱ्यांची नाकेबंदी - संजय राऊत
Publish Later: 
No
Publish At: 
Wednesday, October 6, 2021 - 10:17
Created By: 
Surendra Gangan
Updated By: 
Surendra Gangan
Published By: 
Surendra Gangan
Request Count: 
1
Is Breaking News: 
No