जम्मू काश्मीरपासून वेगळ्या झालेल्या लडाखबद्दल 'या' गोष्टी जाणून घ्या

 लडाखबद्दल काही गोष्टी आपण जाणून घेऊया..

Updated: Aug 5, 2019, 05:42 PM IST
जम्मू काश्मीरपासून वेगळ्या झालेल्या लडाखबद्दल 'या' गोष्टी जाणून घ्या title=

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जम्मू-काश्मीर पुनर्रचना विधेयक राज्यसभेत सादर केले. त्यानुसार जम्मू काश्मीर आणि लडाख अशी दोन भागांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. हे दोन्ही प्रदेश केंद्रशासित असतील. यापैकी जम्मू काश्मीरमध्ये विधानसभा असेल. तर लडाखमध्ये विधानसभा नसेल. या निर्णयामुळे लडाखच्या विकास प्रक्रियेला गती मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. लडाखला निसर्गाची देणगी लाभली आहे. दरवर्षी लाखो पर्यटक केवळ लडाखचे सौंदर्य पाहण्यासाठी जात असतात. आता केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे यामध्ये आणखी भर पडण्याची शक्यता आहे. लडाखबद्दल काही गोष्टी आपण जाणून घेऊया..

विधानसभा नसणार 

लडाखला वेगळ्या केंद्र शासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला आहे. पण इथे विधानसभा निवडणूक होणार नाही. याला वेगळा केंद्र शासित प्रदेश म्हणून मान्यता मिळावी अशी मागणी इथले नागरिक करत होते असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटले.