कुमारस्वामींनी घेतली कर्नाटकाच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ

कर्नाटकात काँग्रेस-जेडीएसचं सरकार

Updated: May 23, 2018, 05:19 PM IST
कुमारस्वामींनी घेतली कर्नाटकाच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ title=

बंगळुरु : एचडी कुमारस्वामी यांच्या नेतृत्वात आज कर्नाटकमध्ये काँग्रेस-जेडीएसचं सरकार स्थापन झालं. कुमारस्वामी यांनी राज्याच्या 26व्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. शपथ ग्रहण कार्यक्रमासाठी अनेक दिग्गज नेते उपस्थित आहेत.  सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह अनेक राज्यांचे मुख्यमंत्री या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. 

लाईव्ह अपडेट

कुमारस्वामींनी कर्नाटकाच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. तर काँग्रेसच्या जी परमेश्वर यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

कर्नाटकात महाआघाडीचं शक्तीप्रदर्शन दिसतं आहे. भाजप विरोधी पक्षाचे सर्व नेते एकाच मंचावर आले आहेत. राहुल गांधी, सोनिया गांधी, ममता बॅनर्जी, शरद यादव, मायावती, शरद पवार, अखिलेश यादव, चंद्रबाबू नायडू, सिताराम येच्यूरी यांच्यासह अनेक नेते या शपथविधी सोहळ्याला उपस्थित आहेत.

शपथविधी कार्यक्रमाची तयारी पूर्ण, कुमारस्वामी थोड्याच वेळात घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि सिताराम येच्यूरी बंगळुरुमध्ये दाखल.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू कुमारस्वामींच्या शपथविधी कार्यक्रमासाठी पोहोचले.