कुमारस्वामींची निवडणुकीपूर्वीची ही भविष्यवाणी ठरली खरी

कुमारस्वामी यांची भविष्यवाणी खरी ठरली

Updated: May 19, 2018, 05:34 PM IST
कुमारस्वामींची निवडणुकीपूर्वीची ही भविष्यवाणी ठरली खरी title=

बंगळुरु : कर्नाटक निवडणुकीपूर्वी किंगमेकर नाही तर किंग बनणार असा दावा करणारे जेडीएस नेते एच.डी कुमारस्वामी काँग्रेसच्या पाठिंब्यामुळे आता कर्नाटकचे मुख्यमंत्री होणार आहे. कुमारस्वामी यांनी आपले वडील आणि माजी पंततप्रधान एचडी देवेगौडा यांच्या अशा प्रकारे संधीचा योग्य वापर करण्याची कला शिकली आहे. कुमारस्वामी यांचा पक्ष राज्यात सर्वात लहान पक्ष ठरला असला तरी त्यांचा मुख्यमंत्री होणार आहे.

कुमारस्वामी यांचा राजकारणात प्रवेश 1996 मध्ये झाला. कनकपुरा येथून त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली. त्यांनी या निवडणुकीत विजय मिळवला. यानंतर 2004 मध्ये विधानसभा निवडणूक जिंकली. 2006 च्या सुरुवातीला कुमारस्वामी यांनी पक्षासाठी धोका असल्याचं सांगत देवेगौडा यांच्या विरोधात जावून सिंह सरकारचं  समर्थन काढून घेतलं. कुमारस्वामी यांनी या नंतर भाजपच्या समर्थनाने सरकार स्थापन केलं आणि मुख्यमंत्री बनले. 

कुमारस्वामी यांचं वर्चस्व यानंतर पक्षात वाढलं. यानंतर त्यांच्या कुटुंबात वाद झाला. कारण त्यावेळी मोठा भाऊ एच.डी रेवन्ना यांना गौडांचा उत्तराधिकारी मानलं जात होतं. यानंतर पक्षातील  वरिष्ठ नेता सिद्धरमैया यांना देखील हे जाणवलं आणि त्यानंतर त्यांना देखील जेडीएस काढून टाकण्यात आलं होतं.