नवी दिल्ली : १४ ऑगस्टला म्हणजेच आज भारतासहीत इतरही देशातील हिंदू धर्मातील लोक श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करणार आहेत हा उत्सव भगवान श्रीकॄष्ण यांच्या जन्माच्या निमित्ताने साजरा केला जातो.
असे मानले जाते की, भाद्रपद मासातीला कॄष्ण पक्षाच्या अष्टमी तिथीला भगवान श्री कॄष्णांनी पॄथ्वीवर अवतार घेतला होता. श्रीकृष्णांनी हा अवतार आपला अत्याचारी मामा कंस याचा विनाश करण्यासाठी घेतला होता.
हा अवतार मथुरेत अष्टमीच्या अर्ध्या रात्री घेतला गेला होता. या दिवशी मंदिरांना खास सजवलं जातं. आणि रासलीलेचं आयोजन केलं जातं. यावेळी अष्टमी तिथी सायंकाळी ७.४५ वाजेपासून ते १५ ऑगस्टच्या सायंकाळी ५.३९ वाजेपर्यंत असणार आहे. १५ ऑगस्ट रोजी संध्याकाळनंतर नवमी सुरु होणार आहे. कृष्णाच्या जन्माच्या दिवशी अष्टमी आणि रोहीणी नक्षत्र होते. मात्र हे दोन्ही यावेळी ३ वेगवेगळ्या दिवशी आले आहे. १४ आणि १५ ऑगस्ट रोजी अष्टमी तर १५ आणि १६ रोजी रोहीणी नक्षत्र आले आहे. १५ ऑगस्टच्या रात्री २.३२ मिनिटांनी रोहीणी नक्षत्र सुरु होणार असून १६ ऑगस्ट रोजी रात्री १२.५० या वेळेला ते संपणार आहे.
मात्र हिंदू पंचांगानुसार तुम्हाला जन्माष्टमीची पूजा करायची असेल तर १५ ऑगस्ट रोजी ही पूजा केलेली चांगली. त्यामुळे १५ ऑगस्टच्या रात्री १२ वाजता कृष्णजन्माची पूजा तुम्ही करु शकता. या दिवशी भगवान श्रीकृष्णाची पूजा केली जाते. जन्माष्टमीच्या दिवशी महामंत्र ‘हरे राम, हरे राम राम राम, हरे हरे’ चा जप केला जातो. या मंत्राचा जप केल्याने फायदा मिळतो असे मानले जाते.