मुंबई : ऑनलाइन पेमेंट आणि UPI पेमेंटमुळे बँकिंग सुविधा किती सोपी झाली आहे. आता बर्याच बँकिंग प्रक्रियेसाठी बँकेत जाण्याची गरज नाही, बहुतेक काम आता फक्त आपण घर बसल्या ऑनलाइन करु शकतो. डिजिटल पेमेंटच्या या ट्रेंडचे फायद्यासोबत तोटे देखील तेवढेच आहे. ज्यामुळे लोकं कधीकधी ऑनलाइन फसवणुकीला बळी पडतात. बऱ्याचदा लोकांकडून असे देखील झाले आहे की, त्याच्याकडून चुकीचा नंबर टाकल्याने किंवा एखादा नंबर बदलल्याने चुकीच्या खात्यात पैसे जमा झाले आहे. अशा वेळी लोकांना खूप नुकसान सहन करावा लागला आहे.
परंतु आता जर तुमच्याकडून असे झाले तर जास्त काळजी करण्याची गरज नाही, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) बँकिंग सुलभ आणि सोयीस्कर बनवण्यासाठी अलीकडच्या काळात अनेक पावले उचलली आहेत, ऑनलाइन बँकिंगसाठी त्यांनी विशेष काळजी घेण्यास सुरूवात केली आहे.
जर तुमच्यासोबत देखील असे घडले. तुम्ही चुकीच्या खात्यावर पैसे पाठवलेत, तर तुम्ही खाली नमूद केलेल्या काही उपाय करु शकता. त्याच वेळी, आम्ही या संदर्भात RBI च्या मार्गदर्शक तत्त्वांबद्दल देखील सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने आपण अशा घटनांमध्ये त्वरित परताव्याची प्रक्रिया सुरू करू शकता.
आता जर तुम्हाला एटीएम, यूपीआय किंवा नेट बँकिंग मधून कोणताही व्यवहार करायचा असेल, तर तुम्हाला लगेच एक मेसेज येईल, ज्यात तुम्ही योग्य व्यवहार केला आहे की, चुकून याची खात्री होईल. या संदेशात तुम्हाला एक फोन नंबर देखील दिला जाईल. जर तुम्ही तो व्यवहार चुकून केला असेल, तर तुम्ही लगेच त्या फोन नंबरवर सांगू शकता की, हा व्यवहार चुकून झाला आहे. अशा मेसेजवर तुमच्या बँकेला त्वरित कारवाई करावी लागेल असे निर्देश RBI ने दिले आहेत.
जर तुम्ही अशा स्थितीत असाल तर तुम्ही ताबडतोब तुमच्या बँकेला त्याबद्दल माहिती द्यावी. हा व्यवहार फसवणुकीमुळे झाला आहे किंवा तुमच्याकडून चुकन झाला असेल, तुम्हा या संबंधीत सगली माहिती बँकेला द्यावी लागेल.
तुम्ही तुमच्या बँकेच्या ग्राहक सेवा क्रमांकावर कॉल करू शकता किंवा तुम्ही स्वतः बँकेच्या शाखेला भेट देऊ शकता. इथे तुम्हाला कोणाच्या खात्यात पैसे गेले, त्याचे बँक खाते, तारीख, वेळ इत्यादी सर्व काही सांगावे लागेल. ज्याला तुम्ही पैसे पाठवले आहेत, त्या बँकेशी संपर्क साधू शकता.
जर बँकेने संपर्क साधूनही प्राप्तकर्त्याने पैसे परत करण्यास नकार दिला तर तुम्ही कायदेशीर कारवाई करू शकता. हे प्रकरण न्यायालयापर्यंत ओढले जाऊ शकते. तुमचा व्यवहार बँकेत आणि कोर्टात दिसेल. सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे की, जर तुम्ही चुकून पैसे ट्रान्सफर केले असतील तर जबाबदारी तुमची बनते, अशा परिस्थितीत बँक सुद्धा त्यासाठी जबाबदार नाही. त्यामुळे केव्हा ही व्यवहार करताना तो घाईत करु नका आणि दोनदा तरी तो नंबर तपासुन घ्या आणि मगच पैसे पाठवा.