मुंबई : Knowledge News : आज आम्ही तुम्हाला अशी माहिती सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला याचा अभिमान वाटेल. तसेच तुमच्या ज्ञानात भर पडेल. भारतीय रेल्वेचा (Indian Railways) इतिहास इतका जुना आणि धक्कादायक आहे की त्याबद्दल जाणून घेतल्यावर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. जगभरात हजारो आणि लाखो रेल्वे प्लॅटफॉर्म आहेत आणि सर्वात लांब प्लॅटफॉर्म भारतात आहे. जगातील सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्मच्याबाबतीत (The longest railway platform in the world) आपला देश सर्वात वर आहे.
जगात लयभारी भारतीय रेल्वे. अमेरिका, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया सुद्धा मागे आहे. उत्तर प्रदेशातील गोरखपूर रेल्वे स्टेशनचे प्लॅटफॉर्म हे जगातील सर्वात लांब प्लॅटफॉर्म आहे. एवढेच नाही, जगातील अव्वल वेबसाइट विकिपीडियाद्वारे काही वर्षांपूर्वी जारी करण्यात आलेल्या सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्मच्या यादीमध्ये भारतातील पहिल्या 10 शहरांच्या रेल्वे प्लॅटफॉर्मपैकी 6 समाविष्ट आहेत.
सर्वात लांब प्लॅटफॉर्मच्या बाबतीत, देशातील अनेक शहरांच्या रेल्वे स्थानकांनी अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया सारख्या देशांना मागे टाकले आहे. लांब प्लॅटफॉर्मच्याबाबतीत गोरखपूरला पहिले स्थान मिळाले आहे. संपूर्ण जगात लांब गोरखपूर सारखे कोणतेही प्लॅटफॉर्म नाही.
जगातील टॉप -10 सर्वात उंच प्लॅटफॉर्मच्या यादीत भारतातील 6 शहरांमध्ये रेल्वे स्थानकांचे प्लॅटफॉर्म आहेत. पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर भारतातील स्थानकांचे प्लॅटफॉर्म आहेत. पहिल्या क्रमांकावर गोरखपूर, दुसऱ्यावर केरळ, तिसऱ्यावर पश्चिम बंगाल, पाचव्या क्रमांकावर छत्तीसगढ, सातव्या क्रमांकावर झाशी आणि दहाव्या क्रमांकावर बिहारमधील एक स्टेशन सर्वात लांब प्लॅटफॉर्म समाविष्ट करण्यात आले.
1. गोरखपूर (उत्तर प्रदेश) - प्लॅटफॉर्मची लांबी 4483 फूट म्हणजे 1366.33 मीटर
2. कोल्लम (केरळ) स्टेशन - प्लॅटफॉर्मची लांबी 3873 फूट म्हणजेच 1180.5 मीटर
3. खरगपूर (पश्चिम बंगाल) स्टेशन - प्लॅटफॉर्मची लांबी 3519 फूट म्हणजे 1072.5 मीटर
4. स्टेट स्ट्रीट ऑफ शिकागो (यूएस) - हा भुयारी मार्ग आहे. प्लॅटफॉर्मची लांबी 3501 फूट म्हणजेच 1067 मीटर (उत्तर अमेरिकेतील सर्वात लांब प्लॅटफॉर्म)
5. बिलासपूर (छत्तीसगड) स्टेशन - प्लॅटफॉर्मची लांबी 2631 फूट म्हणजेच 802 मीटर आहे
6. शेरेटन शटल टर्मिनल फोकस्टोन (यूके) - प्लॅटफॉर्मची लांबी 2595 फूट म्हणजेच 791 मीटर आहे. युरोपमधील सर्वात लांब स्टेशन.
7. झाशी (यूपी) - प्लॅटफॉर्मची लांबी 2526 फूट म्हणजे 770 मीटर
8. पर्थ (पश्चिम ऑस्ट्रेलिया) - पूर्व पर्थ रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्मची लांबी 2526 फूट म्हणजे 770 मीटर आहे. ऑस्ट्रेलियाचे सर्वात लांब स्टेशन.
9. कॅलगूर्ली स्टेशन (वेस्टर्न ऑस्ट्रेलिया) - प्लॅटफॉर्मची लांबी 2493 फूट म्हणजे 760 मीटर आहे.
10. सोनपूर स्टेशन (बिहार) - प्लॅटफॉर्मची लांबी 2421 फूट म्हणजे 738 मीटर