PF फंडातील रक्कम एका मिनिटात जाणून घ्या, मिस्ड कॉल द्या किंवा SMS करा

विविध माध्यमातून पीएफमधील रक्कम (Provident Fund balance Enquiry) किती आहे, हे जाणून घेता येतं.    

Updated: Jul 18, 2021, 06:34 PM IST
PF फंडातील रक्कम एका मिनिटात जाणून घ्या, मिस्ड कॉल द्या किंवा SMS करा title=

मुंबई :  प्रॉव्हीडेंट फंडमधील (Provident Fund) रक्कम जाणून घेण्यासाठी अनेक जण इपीएफओद्वारे (EPFO) ऑनलाईन पासबूक डाऊनलोड करतात. पण पीएफधारक पीएफच्या वेबसाईटवर न जाता विविध 4 माध्यमातून तुम्हाला पीएफमधील रकक्म जाणून घेता येते. तुम्ही फक्त एक मिस कॉल किंवा एसएमएसद्वारेही जाणून घेऊ शकता. मात्र तुम्हाला तुमचा यूएनआय (UAN) नंबर ठावूक असायला हवा. पीएफमध्ये किती पैसे आहेत, हे जाणून घेण्यासाठीचे विविध मार्गांद्वारे आपण जाणून घेऊयात. (know your provident fund details via miised call or sms)   

मिस्ड कॉलद्वारे जाणून घ्या पीएफ (PF) रक्कम

फक्त एका मिस कॉलद्वारे पीएफधारकाला त्याच्या खात्यात किती रक्कम जमा झालीये, याची माहिती मिळते. ही माहिती जाणून घेण्यासाठी तुम्हाला फक्त 01122901406  या नंबरवर मिस कॉल द्यावा लागेल. मात्र यासाठी तुमचा मोबाईल नंबर हा पीएफ खात्याशी लिंक असायला हवा. मोबाईल लिंक नसेल, तर तुम्हाला पीएफबाबतची माहिती मिळणार नाही.

SMS द्वारेही मिळते माहिती

SMS द्वारेही पीएफ खात्यातील पैशांची माहिती एसएमएसद्वारे जाणून घेऊ शकता. विशेष म्हणजे पीएफधारकाला एकूण 10 भाषांमध्ये पीएफबाबतची माहिती जाणून घेता येते. यासाठी पीएफधारकाला यूएएन नंबरसह लिंक असलेल्या मोबाईल नंबरवरुन मेसेज करावा लागेल. यासाठी पीएफधारकाला EPFOHO UAN असा मेसेज टाईप करुन आपल्याला हव्या असलेल्या भाषेतील पहिले 3 शब्द टाईप करुन 7738299899 या नंबरवर मेसेज करावा लागेल.

उमंग अ‍ॅप (Umang App)

तसेच एसएमस आणि मिस कॉलशिवाय उमंग अ‍ॅपच्या मदतीनेही पीएफमधील रक्कम जाणून घेता येते. एकाच अ‍ॅपच्या माध्यमातून सरकारी सुविधांचा सर्वसामन्यांना लाभ व्हावा या हेतून सरकारने उमंग अ‍ॅप तयार केलंय. या अ‍ॅपवर पीएफधारकाला रजिस्टर्ड  मोबाईल नंबरवरुन One Time Registration करावं लागेल. यानंतर तुम्हाला पीएफ खात्यातील सविस्तर माहिती पाहता येईल.