नवी दिल्ली : कोरोना विषाणूच्या दरम्यान सोन्यातील गुंतवणूक मोठ्याप्रमाणात वाढली आहे. सोने आणि चांदीच्या किंमतींनी मोठी उसळी घेतली आहे. परंतु काही दिवसांपासून सोन्याच्या किंमतींमध्ये घसरण पहायला मिळाली. त्यामुळे सोने खरेदी कडे ग्राहकांचा कल दिसून येत आहे. त्यामुळे सोने खरेदी करताना याचे गणित करणे महत्वाचे आहे की, विकताना किती टॅक्स द्यावा लागेल.
सोन्याच्या दागिन्यांवर किती टॅक्स?
सोन्याच्या किंमती बाजारात दागिन्यांचे वजन आणि कॅरेटच्या हिशोबाने वेगवेगळे असते. परंतु सोन्याचे दागिने विकत घेतल्याने त्याच्या किंमती आणि मेकिंग चार्जवर 3 टक्के GST तुम्हाला भरावा लागेल. डिजिटल ट्रान्जेक्शन वाढल्यापासून लोकांनी कॅशमध्ये सोने खरेदी करणे कमी केले आहे. डिजिटल माध्यमातून सोने खरेदी सुरू आहे. म्हणजेच सोने खरेदीचे पेमेंट डिजिटल किंवा कार्डच्या माध्यमांतून करता येते.
विकन्यावर लागतो टॅक्स?
सोने विकताना देखील ग्राहकांना टॅक्स द्यावा लागतो. विकताना पाहिले जाते की, दागिने तुमच्याकडे किती दिवसांपासून आहे. त्या अवधीच्या हिशोबाने त्यावर टॅक्स लागू होईल. सोन्यावर शॉर्ट टर्म कॅपिटल गेन आणि लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स भरावा लागू शकतो.
शॉर्ट टर्म कॅपिटल गेन
सोने खरेदी केल्यानंतर 3 वर्षांच्या आता तुम्हाला दागिने विकल्यास तुम्हाला STCG नियमांच्या अंतर्गत टॅक्स भरावा लागतो. दागिने विकल्यानंतर येणाऱ्या पैशावर इनकम टॅक्सच्या स्लॅबच्या हिशोबाने टॅक्स लागतो
लॉंग टर्म कॅपिटल गेन
3 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त जुने दागिने विकल्यास LFCG च्या नियमांअतर्गत टॅक्स भरावा लागतो. टॅक्सचा दर 20.80 टक्के असतो. तसेच 4 टक्के सेस देखील लागतो. त्याआधी सोन्याचे दागिने विक्रिवर 20.60 टक्के LFCG लागत असे.