Knowledge : कॅपवरील हे बटण का लावले जाते? या बटणाला काय म्हणतात? जाणून घ्या रंजक माहिती

चला या टोपावरील बटणामागचं कारण जाणून घेऊ या.

Updated: Jul 14, 2022, 06:23 PM IST
Knowledge : कॅपवरील हे बटण का लावले जाते? या बटणाला काय म्हणतात? जाणून घ्या रंजक माहिती title=

मुंबई : बहुतांश लोक फिरायला जातात किंवा खेळायला जातात, तेव्हा ते आपल्या डोक्यावर कॅप आवर्जून घालतात. उन्हाळ्यात उन्हापासून वाचण्यासाठी अनेकजण टोपीही घालतात. विशेषत: खेळाडू टोपी घालतात. तसे पाहाता कॅप घालनं ही एक स्टाईल देखील बनली आहे. ज्यामुळे बहुतांश लोक तिचा वापर करतात. तुम्ही देखील कधीही ना कधी कॅप घातलीच असेल. मग तुम्ही कधी कॅपच्या किंवा टोपीच्या डिझाइनला नीट पाहिलं आहे? कॅपच्या वरच्या बाजूला एक बटण लवलेला असतो. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की हा बटण नक्की कशासाठी लावला जातो?

चला तर मग टोपावरील या बटणामागचं कारण जाणून घेऊ या.

रिपोर्ट्सनुसार, बटण असलेल्या कॅपला बेसबॉल कॅप म्हणतात. परंतु तुम्ही पाहिलं असेल की, नुसते बेसबॉल खेळाडूच नाही तर क्रिकेट किंवा इतर खेळ खेळणारे खेळाडू देखील अशाच टोप्या घालतात.

हे तर झालं कॅपचं आता, या कॅपवरील या बटणाला काय म्हणतात तुम्हाला माहितीय?

कॅपच्या वरच्या बटणांना 'स्क्वॅची' किंवा 'स्क्वाचो' म्हणतात. तुम्ही विचार करत असाल की, असे विचित्र नाव का? वास्तविक, बेसबॉल खेळाडू आणि समालोचक बॉब ब्रेनली यांनी बेसबॉल कॅपच्या वरच्या या बटणाला हे विचित्र नाव दिले होते. त्याने हे नाव 1980 च्या दशकात त्याच्या सॅन फ्रान्सिस्को संघातील माईक क्रुको याच्याकडून ऐकले होते.

माईकने हा शब्द पिट्सबर्गच्या पुस्तकांच्या दुकानातील पुस्तकात वाचला. माईकने ज्या पुस्तकात स्क्वाचो हा शब्द वाचला होता, त्या पुस्तकात या शब्दाचा अर्थ टोपीवरील बटण असा होता. तेव्हापासून हे नाव खूप लोकप्रिय झाले आहे.

आता हे बटण टोपीवर का असते हे जाणून घेऊ

टोपीचा वरचा भाग वेगवेगळ्या फॅब्रिक्स एकत्र करून बनवला जातो. जेथे सर्व तुकडे टोपीच्या वरच्या बाजूस जमा केले जातात, तेथे एकतर छिद्र किंवा विचित्र संयुक्त आहे. जे पाहाताना खूपच वाईट दिसते आणि ते कॅपटी डिझाइन देखील खराब करते, ज्यामुळे ते झाकण्यासाठी आणि टोपीला सुंदर बनविण्यासाठी हे गोलाकार बटणासारखे लावले जाते.