इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी एजंटला पैसे देण्याची गरज नाही, जाणून घ्या सोपा मार्ग

आपण काही सोप्या पद्धतीने स्वत: आयटीआर फाइल केल्यास खर्च टाळता येईल.

Updated: Jun 23, 2022, 08:09 PM IST
इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी एजंटला पैसे देण्याची गरज नाही, जाणून घ्या सोपा मार्ग title=

Income Tax Return: वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला कर भरावा लागतो. मात्र, सध्या कर भरण्यासाठी दोन स्लॅब आहेत. जुन्या स्लॅबनुसार कर भरला तर वेगळ्या टक्केवारीनुसार कर भरावा लागेल. त्याच वेळी, जर तुम्ही नवीन स्लॅबनुसार कर भरला तर वेगळ्या टक्केवारीनुसार कर भरावा लागेल. त्याच वेळी, लोकं कर भरण्यासाठी एजंटची मदत देखील घेतात.

लोकांना कर भरणे हा प्रकार खूपच किचकट वाटतो. त्यामुळे अनेक लोकं कर भरण्यासाठी एजंटची मदत घेतात आणि त्याला पैसे देतात. आपण काही सोप्या पद्धतीने स्वत: आयटीआर फाइल केल्यास हा खर्च टाळता येईल. आयकर विभागाने ऑनलाइन कर भरण्यासाठी काही स्टेप्स दिल्या आहेत. त्यांचा अवलंब करून, तुम्ही देखील सहजपणे ऑनलाइन आयकर भरू शकता.

ऑनलाइन इन्कम टॅक्स रिटर्न कसा भरावा 

  • सर्व प्रथम www.incometaxindiaefiling.gov.in वर जा.
  • तुमचा पॅन नंबर वापरून लॉग इन करा.
  • 'डाउनलोड्स' वर जा आणि संबंधित वर्षाखालील ITR-1 (सहज) रिटर्न प्रीपरेशन सॉफ्टवेअर निवडा. ते एक्सेल म्हणून डाउनलोड केले जाईल.
  • एक्सेल शीट उघडा आणि फॉर्म-16 शी संबंधित तपशील भरा.
  • सर्व तपशीलांची कॅलक्युलेशन करा करा आणि पत्रक सेव्हा करा.
  • 'सबमिट रिटर्न' वर जा आणि सेव्ह केलेली एक्सेल शीट अपलोड करा.
  • आता तुम्हाला डिजिटल स्वाक्षरी अपलोड करण्यास सांगितले जाईल. तुम्ही ही स्टेप्स वगळू शकता.
  • Successful e-filing Submission संदेश तुमच्या स्क्रीनवर प्रदर्शित होईल.
  • आयटीआर पडताळणी फॉर्म तुमच्या नोंदणीकृत ईमेल आयडीवर पाठवला जाईल.

ITR पडताळणी फॉर्म कसा डाउनलोड करायचा?