आपलं ठरलंय... भाजपसोबत जाणार... एकनाथ शिंदे गटाचा नवा व्हिडिओ समोर

एकनाथ शिंदे यांचं समर्थक आमदारांना मार्गदर्शन, पहिल्यांदाच भूमिका केली जाहीर

Updated: Jun 23, 2022, 07:32 PM IST
आपलं ठरलंय... भाजपसोबत जाणार...  एकनाथ शिंदे गटाचा नवा व्हिडिओ समोर title=

Eknath Shinde Live : शिवसेनेते बंडखोर नेते  एकनाथ शिंदे सध्या समर्थक आमदारांसह गुवाहाटीत आहेत. गुवाहाटीतल्या हॉटेलमधला एकनाथ शिंदे यांचा नवा व्हिडिओ आता समोर आला आहे. या व्हिडिओत एकनाथ शिंदे समर्थक आमदारांना मार्गदर्श करताना दिसत आहेत. 

काय म्हटलंय एकनाथ शिंदे यांनी
आमचे सर्व निर्णय घेण्याचे अधिकार आमचे गटनेते एकनाथ शिंदे यांना देत असल्याचं समर्थक आमदार सांगतायत. त्यानंतर सर्व आमदारांनी हात वर करुन त्याला समर्थन दिलं.

जे काय सुख-दु:ख आहे ते आपल्या सर्वांचं आहे, काही असेल तर आपण एकजुटीने कितीही काही होऊ द्या विजय आपलाच आहे असं एकनाथ शिंदे सांगताना दिसत आहेत. 

भाजप नॅशनल पार्टी आहे, महाशक्ती आहेत, त्यांनी अख्ख्या पाकिस्तानला धडा शिकवला आहे. त्यांनी मला सांगितलंय तुम्ही जो हा निर्णय घेतलाय तो ऐतिहासिक आहे. तुमच्या मागे आमची पूर्ण शक्ती आहे, कुठेही काही लागलं तर कमी पडणार नाही याची प्रचिती जेव्हा जेव्हा आवश्यकात भासेल तेव्हा तेव्हा सर्वांना येईल.