मुंबई : काही दिवसांपूर्वी फॉर्ब्सने १०० प्रभावशाली महिलांची यादी जाहीर केली. टॉप १०० यादींमध्ये जर्मनीच्या चान्सलर एन्जेला मर्कल, थेरेसा मे आणि मेलिंडा गेट्स यांच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे.
फॉर्ब्सच्या यादीमध्ये पाच भारतीय महिलांचाही समावेश आहे. त्यापैकी एक नाव म्हणजे एचसीएलच्या रोशनी नादर मल्होत्रा.
प्रभावशाली महिलांच्या यादीमध्ये ५७ व्या क्रमाकांवर रोशनी नादर मल्होत्रा यांचे नाव समाविष्ट करण्यात आले आहे. रोशनी आज ४८ हजार करोड रूपयांच्या कंपनीची सीईओ आहे. २००९ पासून रोशनी एचसीएल या आयटी कंपनीची सीईओ आहे.
रोशनी नादर मल्होत्रा यांच्या करिअरची सुरूवात एका न्यूज चॅनलमध्ये इंटर्न म्हणून झाली होती.
एचसीएल ही कंपानी टेक्नोलॉजी, हेल्थकेअर आणि इन्फोसिस्टिममध्ये काम करणारी कंपनी आहे.
एचसीएल टेक्नोलॉजीसोबतच स्ट्रॅटिजिक निर्णय देखील घेते.
२००९ साली २७ वर्षीय रोशनी या कंपनीची सीईओ बनली. आज या कंपनीची मार्केट व्हॅल्यू सुमारे 48 हजार करोड आहे.
रोशनी शिव नादर फाऊंडेशनची ट्रस्टीदेखील आहे. या फाऊंडेशन अंतर्गत भारताप्रमाणेच परदेशामध्येही सक्रिय काम केले जाते. ग्रेटर नोएडामध्ये या फाऊंडेशनची मोठी युनिव्हर्सिटीदेखील आहे.
नादर फाऊंडेशनच्या कामामध्ये रोशनीला तिचे पती शिखर मल्होत्रा मदत करतात. २०१० साली शिखरसोबत विवाहबद्ध होताना ते एचसीएल हेल्थ केअरचे चेअरमेन होते.
रोशनीचे शालेय शिक्षण दिल्लीत झाले. त्यानंतर त्या नॉर्थवेस्टन युनिव्हर्सिटीमध्ये मीडीया विषयात ग्रॅज्युएशन करण्यासाठी गेल्या.
सीएनबीसी न्यूज चॅनलमध्ये त्यांनी इंटर्न म्हणून काम केले. पुढे त्यांनी काम सोडून दिले. केल्लोग ग्रॅज्युएट स्कूल ऑफ मॅनेजमेंट मधून सोशल इंटरप्राईज मॅनेजमेंट एन्ड स्ट्रॅटजी यामध्ये एमबीए केले. २००८ साली भारतामध्ये परतलेल्या रोशनीने वडीलांसह एचसीएल कॉर्पोरेशनमध्ये काम करायला सुरूवात केली. आजही रोशनी एचसिएलमध्ये सीईओ आणि एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर म्हणून काम करते.