Post Office MIS: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना! 10 वर्षांवरील मुलांचे खाते उघडा, मिळवा दरमहा 2500 रुपये

थेंबे थेंबे तळे साचे या म्हणीनुसार प्रत्येक जण एक एक पैसा जमा करत असतो. 

Updated: Jun 26, 2022, 03:32 PM IST
Post Office MIS: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना! 10 वर्षांवरील मुलांचे खाते उघडा, मिळवा दरमहा 2500 रुपये title=

Post Office MIS Scheme: थेंबे थेंबे तळे साचे या म्हणीनुसार प्रत्येक जण एक एक पैसा जमा करत असतो. मात्र पैसे जमा करत असताना त्याचा योग्य परतावा मिळणंही गरजेचं असतं. त्यामुळे अनेक जण बँकांमधील विविध योजनांमध्ये पैसे गुंतवण्याकडे भर देतात. तुम्हाला सुरक्षित नफा आणि कमी गुंतवणुकीत चांगला परतावा हवा असेल तर पोस्ट ऑफिस योजना तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे. पोस्ट ऑफिस एमआयएस ही अशी बचत योजना आहे ज्यामध्ये तुम्ही एकदा पैसे गुंतवून दर महिन्याला व्याजाच्या स्वरूपात त्याचा लाभ घेऊ शकता.

या खात्याचे अनेक फायदे आहेत. हे खातं दहा वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांच्या नावाने देखील उघडता येते. जर तुम्ही तुमच्या मुलांच्या नावाने हे विशेष खाते सुरु केलं, तर तुम्हाला त्याच्या शाळेच्या फीची चिंता करण्याची गरज भासणार नाही. या योजनेशी संबंधित सर्व तपशील जाणून घेऊया.

खाते कुठे आणि कसे उघडायचे

  • तुम्ही हे खाते कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये उघडू शकता.
  • या अंतर्गत, किमान 1000 रुपये आणि जास्तीत जास्त 4.5 लाख रुपये जमा करता येतील.
  • सध्या, या योजनेअंतर्गत व्याज दर  6.6 टक्के आहे.
  • जर मुलाचे वय 10 वर्षांपेक्षा जास्त असेल, तर तुम्ही हे खाते त्याच्या नावावर उघडू शकता.
  • जर मुलाचे वय 10 वर्षांपेक्षा कमी असेल तर त्याऐवजी पालक हे खाते उघडू शकतात.
  • या योजनेची मॅच्युरिटी 5 वर्षे आहे, त्यानंतर ती बंद केली जाऊ शकते.

जाणून घ्या कॅलक्यूलेशन 

  • जर तुमचे मूल दहा वर्षांचे असेल आणि तुम्ही त्याच्या नावावर दोन लाख रुपये जमा केले तर तुमचे व्याज सध्याच्या 6.6 टक्के दराने 1100 रुपये होईल.
  • पाच वर्षांत, हे व्याज एकूण 66 हजार रुपये होईल आणि शेवटी तुम्हाला २ लाख रुपये परतावा देखील मिळेल.
  • तुम्हाला एका लहान मुलासाठी 1100 रुपये मिळतील, जे तुम्ही त्याच्या शिक्षणासाठी वापरू शकता.
  • ही रक्कम पालकांसाठी चांगली मदत होऊ शकते.
  • तुम्ही 4.5 लाख रुपये जमा केल्यास तुम्हाला दरमहा सुमारे 2500 रुपये मिळतील.