LIC कडे तुमचे पैसे तर बाकी राहिलेले नाहीत ना, २ मिनिटात बसल्या जागी चेक करा

एलआयसीकडे जमा असलेल्या रक्कमेबाबतची माहिती अवघ्या काही मिनिटांमध्ये जाणून घेता येईल. 

Updated: Jun 6, 2021, 06:37 PM IST
LIC कडे तुमचे पैसे तर बाकी राहिलेले नाहीत ना, २ मिनिटात बसल्या जागी चेक करा title=

मुंबई : उज्जवल भविष्यासाठी गुंतवणूक म्हणून अनेक जण एलआयसीच्या (life insurance corporation of india) विविध योजनांमध्ये पैसे गुंतवतात. काही महिने सुरळीतपणे योजनांचे हफ्ते भरले जातात. मात्र नंतर काही आर्थिक अडचणींमुळे हफ्ते भरता येत नाही. त्यामुळे पॉलिसीधारक योजनेकडे दुर्लक्ष करु लागतो. परिणामी एलआयसीकडे किती रक्कम बाकी आहे, याबाबतचा विसर पडतो. तसेच या रक्कमेसाठी बरेच जण दावा करत नाहीत. तुमचीही काही रक्कम एलआयसीकडे बाकी आहे का हे अवघ्या काही मिनिटांमध्ये जाणून घेता येतं. (Know about how to claim your old policy Unclaimed and outstanding amount in lic)

एलआयसीकडे आतापर्यंत अनेकांची रक्कम पडून आहे. या रक्कमेसाठी अजूनही कोणी दावा केला नाही. एलआयसीकडे बाकी असलेली रक्कम मिळवण्यासाठी ठराविक कालावधी असते. त्या कालावधीनंतर ही रक्कम एलआयसीनुसार दावा न केलेल्या संपत्तीत वळती केली जाते. तुम्हाला कुटुंबातील सदस्यांची एलआयसीमध्ये असलेल्या गुंतवणूकीबद्दल माहिती जाणून घेता येते. हे तुम्हाला एलआयसीद्वारे जाणून घेता येतं. 

डेथ क्लेम, मॅच्युरिटी क्लेम, सर्व्हायव्हल बेनिफिट्स, प्रीमियम परतावा किंवा नुकसान भरपाईच्या दाव्याच्या रूपात एलआयसीमध्ये रक्कम जमा केली असेल, तर याबाबत तुम्हाला एलआयसीच्या वेबसाईटद्वारे माहिती जाणून घेता येते. याबाबत आपण सविस्तर जाणून घेऊयात. 

टप्प्यानुसार जाणून घ्या

एलआयसीकडे जमा असलेल्या रक्कमेबाबतची माहिती अवघ्या काही मिनिटांमध्ये जाणून घेता येईल. यासाठी एलआयसीच्या वेबसाईटवर https://licindia.in/Bottom-Links/Unclaimed-Policy-Dues या लिंकवर क्लिक करावं लागेल. या लिकंवर क्लिक केल्यावर तुम्हाला विचारलेली सर्व माहितीची पूर्तता करावी लागेल. यानंतर तुम्हाला एलआयसीकडे तुमची किती रक्कम जमा आहे किंवा नाही याबाबतची माहिती मिळेल. 

नक्की काय माहिती द्यावी लागेल? 

एलआयसीकडे तुमची उर्वरित रक्कम आहे की नाही, हे जाणून घेताना तुम्हाला काही माहिती द्यावी लागेल. यामध्ये पॉलिसी नंबर, विमाधारकाचे नाव, जन्मतारीख आणि पॅन नंबरची माहिती द्यावी लागेल. यामध्ये तुम्हाला जन्मतारीख टाकणं बंधनकारक असणार आहे. यानंतर तुम्हाला तुमची किती रक्कम एलआयसीकडे आहे, याबाबतची माहिती मिळेल. यानंतर तुम्ही एलआयसीसोबत संपर्क साधून ती रक्कम काढण्यासंदर्भात पुढील प्रक्रिया करु शकता.  

संबंधित बातम्या :

पैसे वाचवणारी बातमी | जर RBI ने रेपो रेटमध्ये बदल केले नाहीत, तर लोनवाल्यांनी काय करायचं?

जर कर्जदाराचा मृत्यू झाला, तर त्या कर्जाचं काय होतं? माफ होतं की, कुणाला द्यावं लागतं?