जर कर्जदाराचा मृत्यू झाला, तर त्या कर्जाचं काय होतं? माफ होतं की, कुणाला द्यावं लागतं?

कर्जधारकाच्या मृत्यूनंतर कर्जाची उर्वरित रक्कम कोण भरतं, असा प्रश्न आतापर्यंत अनेकांना पडला असेल. याबाबतचे नियम काय आहेत, हे आपण जाणून घेणार आहोत.

Updated: Jun 6, 2021, 05:34 PM IST
जर कर्जदाराचा मृत्यू झाला, तर त्या कर्जाचं काय होतं? माफ होतं की, कुणाला द्यावं लागतं? title=
मुंबई : अनेकदा विविध कारणांसाठी बॅंकेतून कर्ज (Loan) घेतलं जातं. कर्ज घेण्यामागे अनेक कारणं असतात. गृहकर्ज, वाहन कर्ज, वैयक्तिक कर्ज, विवाह कर्ज या आणि अशा विविध कारणांसाठी बॅंक कर्जपुरवठा करते. मात्र कर्ज घेतल्यानंतर कर्जफेड कशी करायची या किंवा विविध कारणांमुळे कर्जधारकाचा मृत्यू झाल्याच्या घटना अनेकदा घडल्यात. मात्र कर्जधारकाचा मृत्यूनंतर कर्जाची उर्वरित रक्कम कोण भरतं, असा प्रश्न आतापर्यंत अनेकांना पडला असेल. याबाबतचे नियम काय आहेत, हे आपण जाणून घेणार आहोत. (In case of death of the borrower who pays the balance of the loan Learn the rules)
 
नियम काय आहेत? 
 
कर्जधारकाच्या मृत्यू पश्चात विविध कर्जासंदर्भात वेगवेगळे नियम आहेत. कोणत्या कर्जात कर्जधारकाच्या मृत्यूनंतर कोणाला उर्वरित रक्कम द्यावी लागते, याबाबतचे कर्जनिहाय नियम कसे आहेत हे जाणून घेऊयात.

 गृहकर्जाबाबत नियम काय? 

गृहकर्ज घेताना संबंधित व्यक्तीकडून बॅंक त्याच्याकडून घराचे कागदपत्र आपल्या ताब्यात घेते. गृह कर्ज घेतलेल्या व्यक्तीचं मृत्यू झाल्यास उर्वरित कर्जाचे हफ्ते हे कर्जधारकाच्या जवळच्या व्यक्तीला द्यावे लागतात. किंवा कर्जधारकाचा उत्तराधिकारी हे हफ्ते भरण्यास सक्षम असेल तर तो हे कर्ज फेडू शकतो. 
 
याशिवाय मृत कर्जधारकांच्या कुटुंबियांना त्यांच्याकडे असेलली संपत्ती विकून कर्ज फेडावे लागते. असंही शक्य नसल्यास अखेर बँक त्यांच्याकडे तारण ठेवण्यात आलेली संपत्तीचा लिलाव करते. या रक्केमतून बॅंक आपली थकित रक्कम वसूल करते. 
 
काही बॅंकांनी यावर चांगला पर्याय शोधून काढला आहे. बॅंका कर्ज घेताना कर्जधारकाचं विमा काढते. त्यामुळे कर्ज सुरु असताना कर्जधारकाचा मृत्यू झाल्यास बॅंक उर्वरित रक्कम त्या विम्यातून वसूल करते.
 
त्यामुळे जेव्हा केव्हा गृहकर्जासाठी बॅंकेकडे अर्ज केला जातो, तेव्हा बॅंकाकडून विम्याबाबत विचारणा केली जाते. 
  
वैयक्तिक कर्जाचे नियम काय सांगतात? 
 
वैयक्तिक कर्ज सुरक्षित कर्ज नसतं. त्यामुळे वैयक्तिक कर्जधारकाचा मृत्यू झाल्यास उर्वरित रक्कमेची वसूली करता येत नाही. तसेच या वैयक्तिक कर्जासाठी कर्जधारकाच्या उत्तराधिकारी जबाबदार नसतो. त्यामुळे वैयक्तिक कर्ज घेणाऱ्य कर्जधारकाच्या मृत्यूसोबत या कर्जाचा विषय संपतो.  
 
वाहन कर्जाबाबत नियम कसे आहेत?
 
वाहन कर्जही वैयक्तिक कर्जाप्रमाणे सुरक्षित कर्ज नसतं. वाहन कर्ज काढलेल्या व्यक्तीचं मृत्यू झाल्यास बॅंक कर्जधारकाच्या कुटुंबियांना उर्वरित रक्कम भरण्यास सांगते. मात्र ही रक्कम भरण्यास कुटुंबिय सक्षम नसल्यास बॅंक संबंधित वाहन विकून आपली रक्कम वसूल करते.
 
संबंधित बातम्या :