मुंबई : दुधाला संपूर्ण अन्न म्हटले जाते कारण त्यात सर्व प्रकारचे पोषक असतात. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत ते पिण्याचा सल्ला दिला जातो. दुधात पाणी मिसळण्याचे काम शतकानुशतके सुरू आहे, परंतु आधुनिक जगात भेसळ करण्याच्या नवनवीन पद्धती शोधल्या गेल्या आहेत, ज्या शोधणे इतके सोपे नाही. असे दूध किंवा त्यापासून बनवलेल्या पदार्थांचे सेवन केल्यास आरोग्याचे नुकसान होणे निश्चितच आहे. परंतु असे भेसळयुक्त दूध कसे ओळखायचे? असा अनेकांना प्रश्न पडतो. तर चला जाणून घेऊ या की, भेसळ युक्त दुध कसं ओळखाचं?
बऱ्याचदा दुधात पाणी टाकून भेसळ केली जाते. दुधात पाणी शोधणे खूप सोपे आहे, यासाठी तुम्ही दुधाचा थेंब उतारावर टाका. दुधाचा हा एक थेंब हळू हळू खाली पडला, तर समजून घ्या की त्यात भेसळ नाही. परंतु जर का दुधाचा थेंब काही सांडला नाही, तर समजून घ्या की या दुधात पाणी मिसळले आहे.
दुधात डिटर्जंट टाकण्याचे काम बिनदिक्कतपणे केले जात आहे. त्यामुळे असे दूध पिणे टाळणे अत्यंत आवश्यक आहे. एक कप दूध आणि एक कप पाणी मिसळा. जर त्यात फेस येऊ लागला तर समजून घ्या की दुधात डिटर्जंट मिसळले आहे.
युरियाचा रंग पांढरा असतो, तो सामान्यतः खत म्हणून वापरला जातो, परंतु बरेच लोक ते दुधात मिसळून विकतात.
त्याची भेसळ पकडण्यासाठी, दूध एका छोट्या टेस्ट ट्यूबमध्ये ठेवा, आता थोडी सोयाबीन पावडर घाला आणि चांगले मिसळा. आता काही मिनिटे थांबल्यानंतर त्यात लाल लिटमस पेपर टाका. ३० मिनिटांनंतर कागदाचा रंग लाल वरून निळा झाला तर समजून घ्या की दुधात युरिया आहे. जर तसे नसेल तर तुम्ही टेन्शन न घेता दूध पिऊ शकता.
अधिक दूध विकण्यासाठी अनेक व्यापारी सिंथेटिक दूध बनवून विकतात, त्याची चव थोडी कडू असते, गरम केल्यावर ते पिवळे होते. ते प्यायल्याने आरोग्य बिघडू शकते, म्हणून दूध गरम करण्यापूर्वी त्याची चव घ्या. तुम्हाला फरक लगेच जाणवेल.
(विशेष सूचना: इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)