घरात सारखी कोळ्याची जाळी येतात, तर मग करा 'हे' सोपे उपाय

ज्योतिषशास्त्रात याला अशुभ आणि धनसंकटाचे कारण मानलं गेलेय

Updated: Jul 25, 2022, 07:34 PM IST
घरात सारखी कोळ्याची जाळी येतात, तर मग करा 'हे' सोपे उपाय title=

GET RID OF SPIDER WEB : घरात कोळ्याचं जाळं चांगलं दिसत नाही आणि चांगलं मानलं देखिल जात नाही. ज्योतिषशास्त्रात याला अशुभ आणि धनसंकटाचे कारण मानलं गेलेय. जर तुम्हालाही तुमच्या घरात जाळं पाहून कंटाळा आला असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरेल.

घराच्या भिंतींवर आणि छतावर कोळ्याचं जाळं साफ केल्यानंतर लगेच काही दिवसांनी पुन्हा दिसू लागतं. कोळ्यांची जाळी काहीवेळा शारीरिक हानी करतात. त्याच्या संपर्कात येताच त्वचेवर पाण्याचे फोड तयार होतात आणि वेदनाही होतात. 

चला तर मग जाणून घेऊया काही उपाय 

कोळी घरापासून दूर ठेवणे सोपे आहे

कोळी घरातून हाकलून द्या किंवा मारून टाका, त्यानंतरही तो जाळ्यातून निघत नाही.  कारण दुसरा कोळी त्याची जागा घेतो. अशा परिस्थितीत, कोळ्याचं जाळृं काढून टाकल्यानंतर, कोळी पुन्हा घरात दिसू नये, यासाठी काही उपाययोजना करणं आवश्यक आहे. त्यासाठी तुमच्या घरातच अनेक वस्तू आहेत,काय आहेत या गोष्टी, जाणून घेऊया.

मिंट तेल

तुम्हाला पुदिना किंवा पुदिना तेलाचा वास आवडेल, पण कोळ्यांना तो अजिबात आवडत नाही.  हे तेल कोळ्यांवर फवारले तर ते घरातून पळून जातात.  कोळी या तेलाचा तीव्र वास सहन करू शकत नाहीत.  

व्हिनेगर

प्रत्येक घरात  व्हिनेगर असतेच,त्याचा वास येताच कोळी बाहेर येऊन पळून जातात.  त्यात असलेल्या ऍसिटिक ऍसिडमुळे कोळी मारला जातो.,तुम्ही भिंतींच्या कोप-यात व्हिनेगर फवारु शकता.

दालचिनी

दालचिनीचा वास तुमचा मूड सेट करतो आणि कोळ्यांचा मूड खराब करतो.  जर तुम्हाला कोळ्याच्या जाळ्याचा त्रास होत असेल तर ज्या ठिकाणी कोळी आहेत त्या ठिकाणी दालचिनी पावडर शिंपडा. दालचिनीचा तीव्र वास कोळ्याला घराबाहेर काढण्यात मदत करतो.

तंबाखू 

तंबाखूच्या वासापासून फक्त सरडेच नाही तर कोळीही पळून जातात. घराच्या कोणत्याही कोपऱ्यात तंबाखू ठेवा. त्याचा तीव्र वास कोळ्यांना घरात राहू देणार नाही.  अशा प्रकारे तुमच्या घरातून कोळी नाहीसे होतील.

रॉकेल

रॉकेल जे कीटक आणि त्यांच्या अळ्यांना वाढू देत नाही.  त्याची फवारणी वेळोवेळी भिंतींवर केली, तर कोळीच काय पण कोणताही किटक भींतीवर  दिसणार नाही.