मुंबई : Sanjay Raut on Kirit Somaiya : भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या ( Kirit Somaiya ) यांनी मोठा घोटाळा केला आहे. त्यांनी या घोटाळ्यातून जवळपास 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमवले आहेत. यातील 15 कोटी रुपये एका ईडीच्या अधिकाऱ्याला दिले आहेत, असा गंभीर आरोप शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत (Sanjay Raut ) यांनी केला आहे. (Kirit Somaiya gave Rs 15 crore to ED officer - Sanjay Raut)
दरम्यान, आज संजय राऊत यांनी एक ट्विट केले आहे. सोमय्या पिता-पुत्र नक्कीच जेलमध्ये जाणार, असे राऊत यांनी पुन्हा एकदा म्हटले आहे. संजय राऊत यांनी ट्विटरद्वारे सोमय्यांवर निशाणा साधला आहे. सोमय्यांच्या पत्रकार परिषदेआधी राऊतांने ट्विट केले. बाप बेटे जेलमध्ये जाणार ! असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
EDच्या नावानं धमकी देऊन सोमय्यानं कोट्यवधी जमा केले. बिल्डर्सना ईडीच्या धमक्या देऊन पैसे लाटले आहेत. 100 कोटींपैकी 15 कोटी एका ईडी अधिकाऱ्याला दिले आहेत, असा थेट आरोप राऊत यांनी केला.
8 जेव्हीपीडी स्कीम, सुजीत नवाब नावाचा एक प्लॉट आहे. हा प्लॉट किरीट सोमय्या आणि त्याचा मित्र बिल्डर अमित देसाई या दोघांनी मूळ मालकाला ईडीची धमकी देऊन शंभर कोटी रुपयांचा प्लॉट मातीमोल भावाने अमित देसाई याच्या नावाने करून घेतला आहे. ईडीची धमकी देऊन हा प्लॉट आपल्या नावे करून घेतला आहे आणि त्यातले पंधरा कोटी रुपये किरीट सोमय्या यांनी कोणत्या ईडी अधिकाऱ्याला नेऊन दिले हे ईडीने स्पष्ट करावे. नाहीतर मी त्या अधिकाऱ्याचं नाव घेईल, असा गंभीर इशारा राऊत यांनी दिला आहे.
बाप बेटे जेल मधे जाणार!
Wait and watch!
कोठडीचे sanitization सुरू आहे..
जय महाराष्ट्र!— Sanjay Raut (@rautsanjay61) February 16, 2022
किरीट सोमय्या हा इन्वेस्टगेटिव्ह अथॉरिटी नाही. भाजपने सांगावं किरीट सोमय्या हा जबाबदार माणूस आहे आणि त्याच्या आरोपाची आम्ही सहमत आहोत. मला कागद वगैरे काही सांगू नका, बंगले आहेत की नाही हे सांगा ?
संजय राऊत यांनी मंगळवारी शिवसेना भवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये भाजप नेते किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या यांच्यावर गंभीर आरोप केले होते. पीएमसी बँक घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी राकेश वाधवानशी किरीट सोमय्यांचे संबंध असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरील आरोपांसंबंधी बोलताना सिद्ध करा, नाही तर जोड्याने मारेन असे म्हटले होते. त्यांच्या या टीकेला किरीट सोमय्या यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेत उत्तर दिले. त्यानंतर राऊत यांनी आज पुन्हा एकदा 100 कोटी रुपयांचा घोटाळा सोमय्या यांनी केला आहे. याचा पुनरउच्चार केला आहे.