जयपुर किडनॅपिंग प्रकरणात एक वेगळाच ट्विस्ट आला आहे. या प्रकरणात किडनॅपर हा चक्क हेड काँस्टेबल असल्याचं समोर आलं आहे. प्रेमासाठी तनुज चाहर यांनी चक्क आपल्या नोकरीवर पाणी सोडलं आहे.
तर झालं असं की, किडनॅपर असलेल्या तनुज चाहरला आपल्या आत्याच्या मुलीशीच प्रेम झाला. या प्रेमाखातरच त्याने आपली नोकरी गमावली. पण प्रेमात अनेकदा अपयशच हाती येतं तसंच झालं. हे दोघं एकमेकांपासून वेगळे झाले आणि प्रेमिकेचं लग्न जयपुरला झालं.
तनुजहा प्रियसीसोबतचा विरह सहन झाला नाही. त्याने प्रियसिचा शोध घेण्याचा निर्णय घेतला. अनेक शहर त्याने पालथी घातली. अखेर प्रियसिचा शोध त्याने लावलाच.
उत्तर प्रदेशातील अलीगढ येथे तैनात असलेले पोलीस हेड कॉन्स्टेबल तनुज चहर याला जयपूर पोलिसांनी आग्राच्या जंगलातून अटक केली आहे. त्याच्यावर मुलाच्या अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याकडून मुलंही जप्त करण्यात आले आहे. 14 जून 2023 रोजी पोलिसांनी तनुजला जयपूरच्या सांगानेर भागातून अपहरण केले होते. पोलिसांनी मुलाच्या कुटुंबीयांना पोलिस ठाण्यात बोलावले. मुलाला त्यांच्या स्वाधीन केल्यावर तो जोरजोरात रडू लागला. अपहरणकर्ता तनुजला त्याने जोरात मिठी मारली. पोलिसांनी मुलाला परत नेले तेव्हा तो रडू लागला. त्याला पाहून अपहरणकर्ताही रडू लागला. पोलिसांनी मुलाला त्याच्या आईच्या ताब्यात दिले.
तनुज आणि त्याच्या प्रेमिकेने नवऱ्याला आपल्या जुन्या नातेसंबंधांबद्दल सांगितलं. पण काही महिन्यांनी ती प्रेग्नेंट असल्याचं कळलं. मुलाचा जन्म झाल्यानंतर नंतर तनुजसोबत नातं संपवलं. यानंतर 14 जून 2023 रोजी प्रेमिकेच्या घरी जाऊन 11 महिन्यांच्या मुलाचं अपहरण केलं. पोलिसांनी मुलाचा ताब्यात घेतलं तेव्हा तो मुलगा 2 वर्षांचा होता.
मुलाला घेऊन किडनॅपर अनेक ठिकाणी फिरला. स्वतः अगदी भिकाऱ्यासारखा राहिला पण त्याने मुलाला सगळ्या गोष्टी पुरवल्या. एवढंच नव्हे तर असं देखील सांगण्यात येतं की, तनुजचं पहिलं लग्न झालं असून त्याला 21 वर्षांचा मुलगा आहे. प्रेमिकेसाठी त्याने आपल्या पत्नी आणि मुलाला देखील सोडलं.
तनुज मुलासोबत मथुरा आणि वृंदावनात भटकत राहिला. दरम्यान, पोलिसांपासून वाचण्यासाठी आणि आपली ओळख लपवण्यासाठी त्याने साधूचा वेश धारण केला आणि कृष्णाचा वेश परिधान केलेल्या मुलासोबत फिरू लागला. त्यांनी मुलाला खूप प्रेमाने ठेवले आणि त्याची पूर्ण काळजी घेतली. तो स्वतः पोलिसात असल्याने त्याने पळून जाण्यासाठी सर्व मार्ग अवलंबले. पोलिसांनी तनुजचा नंबर पाळत ठेवला होता पण तो ज्या मोबाईल आणि सिमवर बोलत होता तो त्याने वापरला नाही.