पती, पत्नी आणि तो! लग्न हे पवित्र बंधन असतं पण या बंधनात तिसऱ्याने एंट्री केली आणि...

गुन्हा करण्यामागचं कारण पोलिसांना कळलं. कारण ऐकताच पोलिसांना धक्काच बसला.

Updated: Sep 10, 2022, 05:14 PM IST
पती, पत्नी आणि तो! लग्न हे पवित्र बंधन असतं पण या बंधनात तिसऱ्याने एंट्री केली आणि...  title=

Crime News : घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. एका निर्माणाधीन इमारतीत एका व्यक्तीचा मृतदेह सापडला होता. पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली. गुन्हा करण्यामागचं कारण पोलिसांना कळलं. कारण ऐकताच पोलिसांना धक्काच बसला. ही हत्या पैशांच्या किंवा मालमत्तेच्या कारणातून झाली नव्हती. मृत व्यक्तीच्या अर्धांगिनीनेच स्वत:च्या पतीला संपवलं होतं. या महिला आरोपीने स्वत:च्याच हाताने कपाळावरचं कुंकू पुसलं होतं. या क्रूर गुन्ह्यात तिला साथ मिळाली तिच्या प्रियकराची. 

दोघांत आला तिसरा

मृत व्यक्तीचे नाव भैरुलाल होतं. तो आपल्या पत्नीसोबत सुखात राहात होता. पत्नीचं नाव केसरबाई होतं. या दोघांच्या सुखी संसारात तिसऱ्याची एंट्री झाली. सुखी संसाराला ग्रहण लागलं. एका शाळेवर शिक्षकेत्तर कर्मचारी असलेल्या बंसीलालने केसरबाईला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. ना वयाचं भान ना समाजाची भीती. प्रेम आंधळं असतं हेच खरं. दोघं एकमेकांवर प्रेम करु लागले. या दोघांच्या प्रेमाला रंग चढू लागला. मुळात या नात्याला प्रेम म्हणणं म्हणजे प्रेमाचाच अपमान ठरेल. कारण हे दोघेही विवाहित असून दोघांमध्ये विवाहबाह्य संबंध निर्माण झाले होते. 

कसा घडला गुन्हा? 

केसरबाई आणि बंसीलाल यांच्या नात्यात अडसर ठरत होता तो केसरबाईचा पती भैरुलाल. केसरबाईचे बाहेर सूत जुळलंय याची कुणकुण भैरुलालला आली होती. यावरुन दोघांमध्ये रोज भांडणं व्हायचं. दोघांमध्ये पुर्वीसारखं प्रेमाचं नातं उरलं नव्हतं. म्हणूनच केसरबाईच्या डोक्यात हत्येचा कट शिजू लागला. या कटात तिने प्रियकर बंसीलालला साथीदार केलं. दोघांनी वेळ आणि दिवस ठरवला. हत्येचा दिवस 1 सप्टेंबर ठरवला होता. भैरुलालला केसरबाई आणि बंसीलालने एकट गाठलं आणि हत्या केली. दोघांना वाटलं वाटेतला काटा निघाला. आता आनंदात राहू. असं वाटू लागलं. पण वडील घरी आले नाहीत त्यामुळं भेरुलालच्या मुलाने पोलीस स्टेशन गाठलं. पोलिसांनी तक्रार नोंद केली. भैरुलालचा तपास सुरु केला. 

अशा आवळल्या आरोपींच्या मुसक्या

पोलिसांकडून तपास सुरु झाला. इतक्यात पोलिसांना एका निर्माणाधीन इमारतीत एक मृतदेह असल्याची माहिती मिळाली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेहाची ओळख पटवण्यात आली. मृतदेह भैरुलालचा असल्याचं स्पष्ट झालं. संशयित म्हणून पोलिसांनी चौकशीला सुरुवात केली तेव्हा केसरबाई पोपटासारखी बोलू लागली. तिने सगळा कट पोलिसांना सांगितला. पोलिसांनी तिचा साथीदार बंसीलालला बेड्या ठोकल्या. दोघेही अटकेत आहेत. घटना उत्तर प्रदेशच्या प्रतापगढ जिल्ह्यातली आहे. 

लग्न हे पवित्रबंधन असतं. या बंधनात तिसऱ्याने एंट्री केली तर तो मोठा विश्वासघात ठरतो; आणि घडतो मोठा गुन्हा.

 pati panti aur wo, extra marital affairs, love dhoka, break up, crime news, crime update