Floods: बघावं तिकडे पाणीच पाणी! संसार पाण्यात, जीव वाचवण्यासाठी धडपड, धक्कादायक video

Floods Viral Video: सध्या सोशल मीडियावर (social media) असाच एक व्हिडीओ (video) तुफान व्हायरल (viral) होतो आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता एका व्हिलाच्या लिव्हिंग रूम आणि बेडरूममध्ये एक माणूस तरंगताना दिसत आहे. स्वतःच्याच घराची ही अवस्था पाहून त्या माणसाच्या डोळ्यात पाणी (water) तरंगतं. घरात (house) बघावं तिकडे पाणीच पाणी आहेत.

Updated: Sep 10, 2022, 05:06 PM IST
Floods: बघावं तिकडे पाणीच पाणी! संसार पाण्यात, जीव वाचवण्यासाठी धडपड, धक्कादायक video title=
treading video 2022 bengaluru floods man swimming into the bedroom Video on social media

Floods Viral Video: पावसाळा म्हटलं की गरमीपासून सुटकारा...हवेत थंडावा, गरमा गरम भज्जी आणि गरम वाफाळलेला चहा...बस मग काय हवं अजून. पण जर या पावसाने आपल्या रौद्ररुप दाखवलं तर अनेकांच्या संसार पाण्यात वाहून जातात. एका नैसर्गिक आपत्तीमुळे कष्टाने उभं केलं घर क्षणात होत्याचं नव्हतं करते. काही दिवसांपूर्वी आपण बातम्यामध्ये  पाहिलं की, राजस्थानमधील पावसामुळे शहरातील रस्त्यांना नदीचं स्वरुप प्राप्त झालं होतं. 

घरात सर्वत्र पाणीच पाणी...

सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता एका व्हिलाच्या लिव्हिंग रूम आणि बेडरूममध्ये एक माणूस तरंगताना दिसत आहे. स्वतःच्याच घराची ही अवस्था पाहून त्या माणसाच्या डोळ्यात पाणी तरंगतं. घरात बघावं तिकडे पाणीच पाणी आहेत. वस्तू तरंगताना दिसतं आहे. घरात किती पाणी भरलं आहे हे दाखविण्यासाठी हा व्यक्ती पाण्यात खाली डुबकी मारून दाखवतो. (treading video 2022 bengaluru floods man swimming into the bedroom Video on social media)

हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. घरातील बेड, कपडे आणि वस्तू पाण्यात तरंगताना दिसतं आहे. हा व्हिडीओ बेंगळुरुमधील असून या ठिकाणी सलग चौथ्या दिवशी मुसळधार पावसाने कहर केला आहे. नाले आणि पुरामुळे सामान्य जनजीवन प्रभावित झालं आहे आणि मालमत्तेचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. 

(Epsilon) एप्सिलॉन हे बंगळुरूमधील एक पॉश कॉलनी आहे.या ठिकाणी विप्रोचे अध्यक्ष ऋषद प्रेमजी, ब्रिटानियाचे सीईओ वरुण बेरी, बायजूचे रवींद्रन, बिग बास्केटचे सह-संस्थापक अभिनय चौधरी यांसारख्या अब्जाधीशांची घरं आहेत. या घरांची अवस्था पाहून पावसामुळे शहरातील पूरस्थितीचा अंदाज तुम्हाला येईल. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Zee News (@zeenews)

पावसात बंगळुरूची अवस्था बिकट

शहरातील बहुतांश भागात रस्त्यांवर पाणी साचलं आहे, मात्र काही भागात अजूनही रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहनांच्या ये-जा करण्यासाठी लोकांना समस्यांना तोंड द्यावं लागतं आहे. पूरग्रस्त भागातील रहिवाश्यांनी कोणी नातेवाईकांकडे तर कोणी मित्रांकडे तर कोणी हॉटेलचा आसरा घेतला आहे. पावसाने जरा विश्रांती घेतली म्हणून एक व्यक्तीने आपल्या घरातील परिस्थिती पाहण्यासाठी गेला असतानाचा हा व्हिडीओ बेंगळुरुमधील पावसाची कहाणी सांगून जातो.