बंगळुरु : काँग्रेसने आपल्या सर्व आमदारांची तातडीची बैठक बोलावली आहे. काँग्रेस नेते सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखाली सकाळी ९.३० वाजता बैठक होणार आहे. या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी काँग्रेसने सर्व आमदाराना नोटीस पाठवली आहे. त्यामुळे बंडखोरी करणारे उपस्थित राहणार का, याचीही उत्सुकता आहे. दरम्यान, बंडखोरी केलेल्या आणि राजीनामा दिलेले काँग्रेसचे आमदार भाजपच्या गळाला लागल्याची चर्चा आहे. मुंबईत ठाण मांडून असलेले बंडखोर आमदार आता गोव्यात राहणार आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या बैठकीत काय निर्णय होतो, त्याकडे लक्ष लागले आहे.
All ministers from #JDS have submitted their resignations just like the 21 ministers from #Congress.
Cabinet reshuffle will happen soon.— CM of Karnataka (@CMofKarnataka) July 8, 2019
कर्नाटक मधील जेडीएस आणि कॉग्रेसच्या मैत्री सरकारचा दुसरा अंक आज पहायला मिळणार आहे. तब्बल १४ आमदारांनी आपल्या आमदारकीचा राजीनाम दिल्यानंतर आता विधानसभा अध्यक्ष रमेश कुमार या राजीनाम संदर्भात काय निर्णय घेणार याकडे सगळ्याच्याच नजरा लागून राहिल्या आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार विधानसभा अध्यक्ष रमेश कुमार हे सर्व आमदाराचे राजीनामे स्विकारण्याआधी राजीनामा दिलेल्या आमदारांना भेटण्यासाठी बोलावून स्वखुशीने राजीनामा दिला की कोणाच्या दबावामुळे हा राजीनामा दिला आहे. याबाबत प्रत्येक आमदारांशी चर्चा करुन त्यानंतर निर्णय घेणार आहे.
कर्नाटकमधल्या राजकीय नाट्याला नवे वळण लागले आहे. काँग्रेसपाठोपाठ जेडीएसच्याही सर्व मंत्र्यांनी राजीनामे दिले आहेत. मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली. काँग्रेसच्या २२ मंत्र्यांनी राजीनामे पक्षाच्या अध्यक्षांकडे दिलेत. पक्षाच्या हितासाठी राजीनामे दिल्याचं सांगितलं जातंय. तर दुसरीकडे मुंबईत असलेल्या काँग्रेस आणि जेडीएसच्या १६ आमदारांना गोव्यात हलवण्यात आले आहे.
Congress MLAs who are staying in Mumbai had planned to shift to Pune, later changing it to Goa. But they are now staying back at an undisclosed location in Mumbai. #Karnataka pic.twitter.com/tqEOgtCgJp
— ANI (@ANI) July 9, 2019
दरम्यान, कर्नाटकातल्या राजकीय अस्थिरतेचे लोकसभेतही पडसाद उमटले. कर्नाटकातल्या अस्थिरतेला भाजपाच जबाबदार असल्याचा आरोप काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी केलाय. तर राजीनामा द्यायची लागण राहुल गांधींनीच काँग्रेस पक्षाला लावल्याचा टोला संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना लगावला आहे.