मुंबई / सातारा : कर्नाटकातील बंडखोर आमदार मुंबईतून गोव्याला जाणार होते. मात्र, ते गोव्यात पोहोचलेच नाहीत. मात्र, ते कोठे गेलेत, याची माहिती नव्हती. ते अज्ञात वासात असल्याचे सांगण्यात येत होते. दरम्यान, काँग्रेस आणि जेडीएसचे बंडखोर आमदार साताऱ्याजवळ अज्ञातवासात असल्याची माहिती मिळत आहेत. खराब हवामानामुळे मुंबईहून गोव्याला जाणे रद्द करण्यात आले आहे. हे बंडखोर आमदार आज संध्याकाळी बंगळुरूत पोहोचणार आहेत, अशी माहिती मिळत आहे.
Congress MLAs who are staying in Mumbai had planned to shift to Pune, later changing it to Goa. But they are now staying back at an undisclosed location in Mumbai. #Karnataka pic.twitter.com/tqEOgtCgJp
— ANI (@ANI) July 9, 2019
दरम्यान, काँग्रेस आमदारांच्या बैठकीपासून किमान सहा आमदार लांब राहिले आहेत. रोशन बेग यांनी बैठकीवर बहिष्कार घातला आहे. सिद्धरामय्यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसची बैठक सुरु आहे. यातए. बी. नागराज, इ. तुकाराम, सुब्बारेड्डी, अंजली निंबालकर, के सुधाकर, राजे गौडा या आमदारांचा यात समावेश आहे.
DK Shivakumar, Congress: Mr Rajnath Singh is telling that 'we are nowhere bothered, we are not interested, we don't know about this' (political situation in Karnataka). BS Yeddyurappa is also saying the same, but he is sending his PA to pick up all our Ministers. #Karnataka pic.twitter.com/WEhaap5Lrx
— ANI (@ANI) July 9, 2019
कर्नाटकमधील जेडीएस आणि काँग्रेस सरकार अल्पमतात आले आहे. तब्बल १४ आमदारांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर आता विधानसभा अध्यक्ष रमेश कुमार या राजीनामासंदर्भात काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांच्याच नजरा लागून राहिल्या आहेत. दरम्यान, ज्या आमदारांनी प्रत्यक्ष भेटून राजीनामा द्यायचा असतो. मात्र, तसे काहीही झालेले नाही. तसेच कोणाच्या दबावाने राजीनामा दिलाय का, याची मी माहिती घेणार आहे. त्यानंतर राजीनाम्याबाबत निर्णय घेईल, अशी माहिती विधानसभा अध्यक्षांनी दिली आहे. त्यामुळे बंडखोर आमदारांचे राजीनामे स्विकारणार का की नाही, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
Karnataka Assembly Speaker, KR Ramesh Kumar: I am nowhere related to the current political developments. I am acting as per the Constitution. Till now, no MLA has has sought an appointment with me. If anyone wants to meet me, I will be available in my office. pic.twitter.com/CgB98duM00
— ANI (@ANI) July 9, 2019
सूत्रांच्या माहितीनुसार विधानसभा अध्यक्ष रमेश कुमार हे सर्व आमदाराचे राजीनामे स्वीकारण्याआधी राजीनामा दिलेल्या आमदारांना भेटण्यासाठी बोलावुन स्वखुशीने राजीनामा दिला की कोणाच्या दबावामुळे हा राजीनामा दिलाय याबाबत प्रत्येक आमदारांशी चर्चा करुन त्यानंतर निर्णय घेणार आहेत. दरम्यान कुमारस्वामी सरकार पूर्णपणे अडचणीत आले असून विधानसभा अध्यक्ष आमदारांच्या राजीनाम्याबाबत काय निर्णय घेतात त्यावरच या सरकारचे भवितव्य आवलंबुन आहे. कारण सद्य परिस्थितीत कर्नाटकमध्ये बहुमतासाठी आवश्यक असणारं संख्याबळ गोळा करण्यात भाजपने बाजी मारली आहे.