कर्नाटक सत्ता संघर्ष : काँग्रेसला आणखी एक धक्का, एक आमदार गायब

काँग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे. बंडखोर आमदारांच्या राजीनाम्यानंतर आणखी एक आमदार हातातून निसटला आहे.  

ANI | Updated: Jul 18, 2019, 11:03 AM IST
कर्नाटक सत्ता संघर्ष : काँग्रेसला आणखी एक धक्का, एक आमदार गायब title=

बंगळुरु : काँग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे. बंडखोर आमदारांच्या राजीनाम्यानंतर आणखी एक आमदार हातातून निसटला आहे. त्यामुळे कर्नाटक काँग्रेसला आणखी एक खिंडार पडले आहे. कागवाडचे आमदार श्रीमंत पाटील काल रात्रीपासून अचानक गायब झालेत. श्रीमंत पाटील हे इतर काँग्रेस आमदारांसह रिसॉर्टवर होते. तिथून ते वैयक्तिक कामाचे कारण देत कालपासून गायब झालेत. कुमारस्वामी सरकारची आज विश्वासदर्शक ठरावाची कसोटी आहे. त्यात आणखी एक आमदार कमी झाल्याने मुख्यमंत्री कुमारस्वामी सरकारची डोकेदुखी वाढली आहे. कुमारस्वामी विधानभवनात पोहोचले आहेत. आज विश्वासदर्शक ठराव होणार आहे.

कर्नाटक काँग्रेसचे आमदार श्रीमंत बाळासाहेब पाटील अचानक गायब झाल्याने जोरदार चर्चा आहे. पाटील यांना रात्री ८ वाजता अखेरचे रिसॉर्टमध्ये पाहिले गेलेत. त्यानंतर ते गायब झाले. अद्याप त्यांचा पत्ता लागलेला नाही. काँग्रेसची १० पथके त्यांचा शोधा घेत असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच त्यांचा फोन स्विचऑफ येत आहे. त्यामुळे त्यांचा शोध घेण्यात अडथळा येत आहे. 

विश्वासदर्शक ठरावाच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी आणि उपमुख्यमंत्री जी. परमेश्वर यांनी काल बुधवारी काँग्रेस आमदारांची प्रकृती रिसॉर्ट येथे बैठक घेतली. यावेळी आमदार श्रीमंत पाटील उपस्थित नव्हते, अशी माहिती पुढे आली आहे. तर दुसरीकडे  बेपत्ता असलेल्या आमदाराबाबत पोलीस तक्रार करण्यात आली आहे. तसेच विधानसभा परिसरात कलम १४४ लागू केले आहे.