आख्या लॉकडाऊनमध्ये पोलिसांना बाहेर फिरण्याचं एवढं मजेदार कारण कुणीच सांगितलं नसेल

आतापर्यंत कोंबडी खाऊन माणसाला अ‍ॅसिडीटी आणि पोटोचा त्रास झाला होता. परंतु इथे तर.........

Updated: Jun 3, 2021, 02:05 PM IST
आख्या लॉकडाऊनमध्ये पोलिसांना बाहेर फिरण्याचं एवढं मजेदार कारण कुणीच सांगितलं नसेल title=

कर्नाटक : कोरोनामुळे देशात सर्वत्र लॉकडाऊन लावले गेले परंतु तरीही काही अती उत्साही लोकां कोरोनाकाळात बाहेर फिरण्यासाठी काही ना काही कारणांच्या शोधातच असतात. बाहेर फिरताना जर पोलिसांनी त्यांना पकडले तर हे लोकं वेगवेगळी आणि विचित्र कारणं देत असतं. जे ऐकून पोलिसांनी अशा लोकांना चांगला चोप दिला. परंतु कर्नाटकमधील या माणसाने बाहेर फिरण्याचे जे कारण दिले आहे, ते ऐकूण पोलिसांना हसूच आवरले नाही. हे कारण इतके भारी आणि विचित्र आहे की, तुम्हालाही हसू आवरणार नाही. कारण हे आत्तापर्यंत पोलिसांना दिलेल्या कारणामधील सर्वात विचित्र कारण आहे.

आतापर्यंत कोंबडी खाऊन माणसाला अ‍ॅसिडीटी आणि पोटाचा त्रास झाला होता. परंतु इथे तर या माणसाच्या कोंबडीला पोटाचा त्रास होत आहे आणि तिचे पोट गच्चं झालंय. आहे ना विचित्र कारण? तुम्हाला ही हे कारण ऐकल्यावर हसू आले असेल.

खरेतर हा माणूस लॉकडाऊन दरम्यान बाहेर पडणार होता. त्यावेळेस त्याला पोलिसांनी थांबवले आणि बाहेर का फिरत आहे असे विचारले? तेव्हा त्या माणसाने उत्तर दिले की,  'कोंबडीला पोटाचा त्रास होत आहे. म्हणून तो तिला प्राण्यांच्या दवाखान्यात घेऊन जात आहे.'

हे कारण ऐकल्यानंतर पोलिसांना हसू आवरले नाही आणि ते जोर जोरत हसू लागले. त्यानंतर पोलिसांनी त्याला त्याच्या कोंबडीला आपल्या घरी घेऊन जाण्याचा सल्ला दिला आणि सांगितले की, "तुला काय करायचे आहे ते घरी नेऊन उपचार कर."

यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणत व्हायरल झाला आहे. लोकं कोंबडीच्या पोटाच्या आजारावर आश्चर्य व्यक्त करु लागले आणि कोंबडीच्या या आजारावर प्रश्न उपस्थित करु लागले. त्यानंतर एका जाणकाराने लोकांच्या कमेंटवर उत्तर देतांना सांगितले की, कधी कधी माणसाला जसे जास्त जेवल्याने पोट गच्चं होते किंवा पोटाचा त्रास उद्धवतो तसे कोंबडीलाही त्रास होतो. त्यामुळे तो माणूस खरे बोलत असावा असे त्याने सांगितले.

या व्हिडीओला लोकं मोठ्या प्रमाणात शेअर आणि प्रतिक्रिया देत आहेत. ज्यामध्ये लोकं खोचक स्वरात म्हणत आहेत की, "कोंबडीला खरोखरचं पोटाचा त्रास झाला तर?" याआधी देखील असा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्या व्हिडीओमध्ये त्यामाणसाने आपल्या गळ्यात एक बोर्ड घातला होता.

ज्यावर त्याने लिहिले होते की, 'मै मिठाई खरीदने जा रहा हू' जे पाहून देखील पोलिसांनी त्याला मिठाई आणू दिली नाही आणि त्याला ओरडून घरी पाठवले. या व्हीडिओला ही सोशल मीडियावर खूप लाईक्स आणि शेअर मिळाले आहेत.