प्रेम केलंय.. अशी सोडणार नाही; आमदाराच्या कार्यालयात एक्स गर्लफ्रेंडचा राडा

विधानसभा निवडणुकीदरम्यान या महिलेने आमदाराविरोधात निवडणूक लढविण्याची घोषणा केली होती तेव्हाच हे प्रकरण पुढे आले होते...

Updated: Jun 22, 2018, 11:18 AM IST
प्रेम केलंय.. अशी सोडणार नाही; आमदाराच्या कार्यालयात एक्स गर्लफ्रेंडचा राडा title=

बंगळुरू: कर्नाटकमध्ये भाजप आमदाराच्या एका कथित प्रेयसीने त्याच्या कार्यालयात जाऊन चांगलाच राडा केला. आमदाराची पत्नी असल्याचा दावा करणाऱ्या या महिलेवर कार्यालयात जाऊन तेथील कर्मचाऱ्यांसोबत गैरवर्तन केल्याचा आरोप आहे. या महिलेने आमदाराला धमकी दिल्याचेही समजते. दरम्यान, आमदाराला ब्लॅकमेल करण्यासाठीच ही महिला असे करत असल्याचीही चर्चा आहे. 

आमदाराची पत्नी असल्याचा महिलेचा दावा

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, म्हैसूरच्या कृष्णाराजा मतदारसंघातून भाजपचे प्रतिनिधित्व करणारे आमदार एसए रामदास निवासस्थानी असलेल्या कार्यालयात गुरूवारी सकाळी पोहोचली. महिलेचे नाव प्रेमाकुमारी असे असल्याचे समजते. कार्यालयात पोहोचल्यावर प्रेमाकुमारीने आपण आमदारांची पत्नी असल्याचे तेथील कर्मचाऱ्यांना सांगितले. तसेच, आपणास आमदारसांहेबांना भेटायचे असल्याचे सांगितले. पण, कर्मचाऱ्यांनी आमदार कार्यालयात नसल्याचे सांगितले.

आमदारांची भेट न झाल्याने राडा

आमदार उपस्थित नसल्याचे समजताच प्रेमाकुमारी प्रचंड संतप्त झाली. तीने आरडाओरडा करण्यास सुरूवात केली. या वेळी तिने उपस्थित कर्मचाऱ्यांना अपशब्द वापरल्याचाही तिच्यावर आरोप करण्यात आला आहे. प्रत्यक्षदर्शींच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे की, प्रेमाकुमारी नामक एक महिला गुरूवरी सकाळी ८.३० च्या सुमारास आमदारांच्या कार्यालयात पोहोचली व तिने आपणास आमदारांना भेटायचे असल्याचे सांगितले. पण, आमदार उपस्थित नसल्याचे समजताच तिने कर्मचाऱ्यांना अपशब्द वापरले.

प्रेम होतं... आहे... आणि भविष्यातही राहणार!

सूत्रांची माहिती अशी की, संतप्त महिलेने जोरजोरात आरडाओरडा केला. तसेच, जोपर्यंत आपण जीवंत आहोत तोपर्यंत आपण रामदासला सोडणार नाही. मीही एका उच्च कुटुंबातील आहे. मी रामदासवर प्रेम करते आणि करत राहणार. प्रेमापोटीच मी त्याच्याविरोधातील उमेदवारी मागे घेतली आहे. मी सातत्याने त्याला भेटण्याचा प्रयत्न करते आहे. पण, तो माझा फोन उचलत नाही. मी त्याला सोडणार नाही.

आमदारांनी ५ कोटी दिल्याची चर्चा

दरम्यान, विधानसभा निवडणुकीदरम्यान या महिलेने आमदाराविरोधात निवडणूक लढविण्याची घोषणा केली होती तेव्हा हे प्रकरण पुढे आले होते. दरम्यान, तिने उमेदवारी मागे घेतली. दरम्यान, या महिलेला उमेदवारी मागे घेण्यासाठी आमदाराने या महिलेस ५ कोटी रूपये दिल्याचीही चर्चा तेव्हा रंगली होती.