बंगळुरु : कर्नाटकातला सत्तासंघर्ष अधिक तीव्र झालाय. भाजप आणि काँग्रेस-जेडीएस या दोन्ही पक्षांनी सत्तास्थापन करणार असल्याचा दावा केला आहे. मात्र, त्याच दरम्यान काँग्रेससाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.
कर्नाटकात सत्तास्थापनेसाठी घोडेबाजार रंगात आल्याचं दिसत आहे. आपल्याच पक्षाची सत्ता स्थापन व्हावी यासाठी दोन्ही पक्ष प्रयत्नशील आहेत. त्यातच काँग्रेस पक्षाचे दोन आमदार भाजपच्या गळाला लागल्याचं वृत्त समोर येत आहे.
बेल्लारी जिल्ह्यातले दोन आमदार गळाला लागले असून दोघेही आमदार रेड्डी बंधूंच्या जिल्ह्यातले असल्याचं कळतयं.
दरम्यान, काँग्रेस आणि जेडीएसच्या नेत्यांनी राजभवनात जाऊन राज्यपालांची भेट घेतली. यावेळी जेडीएस आणि काँग्रेसनं बहुमत असल्याचा दावा करत ११७ आमदारांच्या नावांची यादी राज्यपालांना सोपवली. जेडीएसचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार एच डी कुमारस्वामी आणि काँग्रेसचे नेते हजर होते. यावेळी मात्र राज्यपालांनी सत्ता स्थापनेच्या निमंत्रणाबाबत कुठलंही आश्वासन दिलं नाही. मात्र ,घटनेला धरून निर्णय घेण्यात येईल असं राज्यपालांनी सांगितल्याचं समजतंय.