सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण, आताचा सोन्याचा दर पाहा

खूप दिवसांनी पाहायला मिळाली घसरण

सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण, आताचा सोन्याचा दर पाहा  title=

मुंबई : सोन्याच्या किंमतीत बऱ्याच दिवसांची मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. स्थानिक विक्रेत्यांकडे मागणी कमी असल्यामुळे सराफ बाजारात 430 रुपयांनी घसरण पाहायला मिळाली आहे. बुधवारी 10 ग्रॅम सोन्याची किंमत ही 32,020 रुपये इतकी आहे. आता चांदीचा दर देखील 250 रुपयांनी कमी झाली असून 40,650 हा आताचा भाव आहे. 

व्यापारी आणि शिक्का निर्मात्यांकडून होणारी मागणी कमी झाल्याने चांदीच्या दरात ४०० रुपयांनी घट होत ४०,९०० रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहोचला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर सिंगापूरमध्ये सोन्याच्या दरात ०.१९ टक्क्यांनी घसरण होत ते १,३१०.५० डॉलर प्रति औंसवर पोहोचले. तर चांदीच्या दरातही घसरण होत १६.४१ डॉलर प्रति औंसवर पोहोचलं आहे. राजधानी दिल्लीमध्ये ९९.९ टक्के आणि ९९.५ टक्के शुद्धता असलेलं सोनं १६५ रुपयांनी महागलं. त्यामुळे सोन्याचा दर क्रमश: ३२,४५० रुपये आणि ३२,३०० रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचला आहे.

मंगळवारी न्यूयॉर्क बाजारात सोन्याचा दर खाली आला आहे. 1,290.30 डॉलर प्रति दर आहे. चांदीची किंमत 1.52 टक्क्यांनी खाली आली असून 16.24 डॉलर प्रति आहे. दिल्लीत 99.9 टक्के आणि 99.5 प्रति सोन्याच्या किंमतीत 430-430 अशा दराने खाली आलं असून 32,020 रुपये आणि 31,870 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.