कॉंग्रेसचे 'हे' बंडखोर आमदार राजीनामा मागे घेण्यास तयार

 मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीवर सर्वांचे लक्ष्य लागले आहे. 

Updated: Jul 14, 2019, 07:34 AM IST
कॉंग्रेसचे 'हे' बंडखोर आमदार राजीनामा मागे घेण्यास तयार  title=

नवी दिल्ली : कर्नाटकचे राजकारण सध्या मोठ्या धक्कादायक वळणातून जात आहे. साधारण एक डझन आमदारांनी राजीनामा दिल्यानंतर अडचणीत आलेल्या काँग्रेस-जेडीएस सरकारने आपली शक्ती पणाला लावली आहे. त्यातील दोन आमदारांनी आपला राजीनामा परत घेण्याची तयारी दाखवल्याचे सांगण्यात येत आहे. मी आणि सुधाकरने काँग्रेस पार्टीचा राजीनामा दिला होता. पण मला पार्टीत राहायला पाहीजे हे आमच्या अनेक नेत्यांनी मला सांगितले. म्हणून मी राजीनामा परत घेण्याचा निर्णय घेत असल्याचे काँग्रेस आमदार एमटीबी नागराज यांनी म्हटले आहे.

सुधाकरला मी समजावेन. मला आशा आहे तो देखील आपला राजीनामा मागे घेईल. अशाप्रकारे आम्ही दोघे राजीनामा मागे घेऊ, असे नागराज म्हणाले. काँग्रेस आणि जेडीएसचे दहा आमदार सध्या मुंबईत असून राजीनामा देण्यावर अडून आहेत. 

आम्ही आमचा आमदारांची समजूत घालण्यात यशस्वी होऊ असे मुख्यमंत्री सिद्धरमैया यांना अजूनही वाटतेय. शक्ति प्रदर्शनावेळी सर्व एकत्र असू असे ते म्हणाले. आपला राजीनामा मान्य करण्यासाठी आमदारांनी सर्वोच्च न्यायालयाची पायरी चढल्यानंतर काँग्रेसच्या अडचणी अधिक वाढल्या. काँग्रेस-जेडीएस सरकारच्या एकूण 15 आमदारांनी राजीनामा दिला आहे. दोन अपक्ष आमदार आधीच भाजपासोबत जोडले गेले आहेत. 224 जागांच्या कर्नाटक विधानसभेत भाजपाकडे आता दोन अपक्ष आमदारांसोबत 107 सदस्य आहेत. आता मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीवर सर्वांचे लक्ष्य लागले आहे.