Karnataka News: शाळकरी विद्यार्थिनींनी बुरखा (Burqa) न घातल्याने एका बस चालकाने (Bus Driver) त्या मुलींना बसमध्ये चढू दिलं नाही. बस चालकाने त्या मुलींशी वाद घातला. कर्नाटकमधल्या कलबुर्गीमध्येही (Kalaburgi) ही धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेवर आता तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) झाला आहे. गुरुवारी सकाळी या मुली नेहमीप्रमाणे शाळेत जाण्यासाठी बस स्थानकावर उभ्या होत्या. बस आल्यावर या मुली बसमध्ये चढत असताना चालकांने त्यांना अडवलं. बुरखा का घातला नाही असा जाब त्याने विद्यार्थिनींना विचाररला.
बस चालक बसच्या खाली उतरुन विद्यार्थिनींशी वाद घालत होता. गोंधळ ऐकून काही लोकं त्या ठिकाणी दाखल झाले. पण बस चालकाचं म्हणण ऐकून लोकांनी संताप व्यक्त केला. ही कलबुर्गीमधल्या कमालपूर तालुक्यातील ओकाली गावतून बसवकल्याण या ठिकाणी जात होती. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार मुस्लिम विद्यार्थिनींनी बुरखा परिधान करावा त्यानंतरच त्यांना बसमध्ये प्रवेश दिला जाईल अशी भूमिका त्या चालकाने घेतली होती. चालकाच्या म्हणण्यानुसार मुस्लिम मुलींनी बुरखा परिधान केला पाहिजे, हिजाब घालू नये. याच गोष्टीसाठी त्याने विद्यार्थिनींची अडवणूक केली.
जेव्हा इतर प्रवाशांनी बस चालकाला जाब विचारला तेव्हा त्याने बस चालकाने आपली भूमिका बदलला. बसमध्ये तांत्रिक बिघाड असल्याने विद्यार्थिंनींना बसमधून खाली उतरवल्याचं त्याने सांगितलं. दरम्यान, या संपूर्ण घटनेवर राज्याचे परिवहन मंत्री रामलिंगा रेड्डी यांनी याप्रकरणाची गंभीर दखल घेतली असून चालकाचं वर्तवणूक अयोग्य असल्याचं सांगत कारवाईचं आश्वासन दिलं आहे. याप्रकरणात कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही, पण व्हायरल होणाऱ्या व्हिडिओवरुन बस चालकाचं हे कृत्य योग्य नसल्याचं परिवहन मंत्यांनी म्हटलं आहे. याची सतत्या तपासण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
कर्नाटकमध्ये हिजाबवरुन वाद
कर्नाटकमध्ये या देखील हिजाबवपुन प्रचंड वाद रंगला होता. गेल्या वर्षी हिजाब परिधान करुन आलेल्या शाळकरी विद्यार्थिनींना शाळेत प्रवेश नाकारण्यात आला होता. कोणत्याही जातीधर्माच्या विद्यार्थ्यांनी शाळेत गणवेषच घालावा अशी भूमिका घेण्यात आली होती. या घटनेचे कर्नाटक राज्यात चांगलेच पडसाद उमटले होते. एका कॉलेजमधला वाद इतर शाळा-कॉलेजमध्येही पसरला होता. हिंदु विद्यार्थ्यांनी आंदोलन करत केसरी स्कार्फ गुंडाळूल कॉलेजमध्ये प्रवेश केला होता. हे प्रकरण उच्च न्यायालयात गेलं. उच्च न्यायालयाने कोणत्याही प्रकारचे धार्मिक पोषाख शाळा-कॉलेजमध्ये घालण्यावर बंदी आणली होती.