Karnataka Election : 'प्रियंका गांधींना अमेठीत नमाज पढताना पाहिलं...' स्मृती इराणींच्या वक्तव्याने खळबळ

Smriti Irani Statement: केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या एका वक्तव्याने देशाच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत या विधानाचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. 

राजीव कासले | Updated: May 5, 2023, 10:16 PM IST
Karnataka Election : 'प्रियंका गांधींना अमेठीत नमाज पढताना पाहिलं...' स्मृती इराणींच्या वक्तव्याने खळबळ title=

Karantaka Election 2023 : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला पाच दिवसांचा अवधी राहिला आहे. पण त्यापूर्वी राज्यातील राजकारण प्रचंड तापलं आहे. काँग्रेसने (Congress) आपल्या जाहीरनाम्यात बजरंग दलवर (Bajrang Dal) बंदी आणण्याचं आश्वासन दिल्यानंतर कर्नाटकमध्ये त्याचे पडसाद उमटू लागले आहेत. यातच आता केंद्रीय स्मृती इराणी (Smriti Irani) यांनी केलेल्या एका वक्तव्याने खळबळ उडाली आहे. प्रियंका गांधी-वाड्रा (Priyanka Gandhi) यांना नमाज पडताना पाहिलं आहे, त्या मूर्ती पूजा करत नाही, म्हणूनच त्यांचा राम मंदिराला विरोध आहे, असं स्मृती इराणी यांनी म्हटलं आहे. स्मृती इराणी यांच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फूटलं आहे. 

काँग्रेसवर जोरदार घणाघात
काँग्रेसने एका हिंदू संघटनेची तुलना पीएफआय या आंतकवादी संघटनेशी केल्याचं स्मृती इराणी यांनी म्हटलं आहे. पीएफआय ही संघटना देशातीत सुरक्षा धोक्यात आणण्यासाठी लोकांच्या भावना भडकवतात आणि त्यांना आपल्या संघटनेत सामिल करुन घेतात. पीएफआय ही अशी संघटना आहे, जी हिंदुंची हत्या घडवून आणण्यासाठी कट रचचात. अशा संघटनेशी हिंदू समुदयाची तुला केली जाते असा आरोप स्मृती इराणी यांनी केला आहे. 

'काँग्रेस हिंदू विरोधी'
काँग्रेस पक्ष हिंदू विरोधी असल्याचा आरोपही स्मृती इराणी यांनी केला आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने तयार केलेल्या जाहीरनाम्यावरुन हे स्पष्ट होतं असं त्या म्हणाल्या. जो पक्ष बजरंग बलीचं नाव घेण्याऱ्यांवर नाराजी व्यक्त करतात तो पक्ष किती हिंदू विरोधी असू शकतो हा विचार लोकांनी करायाला हवा असंही स्मृती इराणी यांनी म्हटलंय. 

गांधी कुटुंबावर साधला निशाणा
काँग्रेसने केलेल्या हनुमान मंदिर बनवण्याच्या दाव्यावर बोलताना स्मृती इराणी यांनी पलटवार केला आहे. प्रियंका गांधी यांना आपण स्वत: नमाज पठण करताना बघितल्याचं त्यांनी म्हटलंय. ज्या लोकांना इस्लाम धर्मात रुची आहे ते मूर्तिपूजक होऊ शकत नाही, त्यामुळेच गांधी कुटुंबियांचा राम मंदिराला विरोध आहे असा निशाणा स्मृती इराणी यांनी गांधी कुटुंबियांवर साधला आहे. 

कर्नाटकात 10 मे रोजी मतदान
कर्नाटक विधानसभेसाठी  येत्या 10 मे रोजी मतदान तर 13 मे रोजी मतमोजणी होणार आहे. कर्नाटकात 224 विधानसभा जागा आहेत. भौगलिक परिस्थिती पाहिली तर कर्नाटक हे सहा विभागात विभागलं गेलं आहे.  हैदराबाद-कर्नाटक भागात 40 विधानसभा जागा आहेत. तर मुंबई-कर्नाटकात 44 विधानसभा जागा येतात. जुनं मैसूर भागात 66, समुद्र किनारी क्षेत्रात 18, बंगळुरुमध्ये 28, तर मध्य कर्नाटकात 27 जागा आहेत.