Seema Haider Love Story : पबजी पार्टनरचं प्रेम मिळवण्यासाठी पाकिस्तानातल्या (Pakistan) कराचीमधून सीमा हैदर (Seema Haider) नावाची महिला भारतात पळून आली. भारतात तिला अटक करण्यात आली. सीमाचा पहिला पती गुलाम हैदर याने पुन्हा घरी म्हणजे पाकिस्तानमध्ये परतण्याची विनंती तिला केली आहे. तर प्रयागराजमध्ये (Prayagraj) राहाणारा सचिनने सीमा आपल्यासोबत राहावं अशी इच्छा व्यक्त केली आहे. काठमांडूतल्या एका मंदिरात सचिनबरोबर लग्न केल्याचा दावा सीमा हैदरने केला आहे. ती आता पुन्हा पाकिस्तानात जाऊ इच्छित नाही. तर दुसरीकडे तिचा पहिला पती गुलाम हैदरने थेट पीए मोदी (PM Narendra Modi) यांच्याकडे न्यायाची मागणी केली आहे.
सीमा कशी आली भारतात?
पाकिस्तानमधल्या कराची इथली सीमा हैदर अवैध मार्गाने नेपाल बॉर्डर (Nepal Border) पार करुन भारतात आली. चार मुलांबरोबर भारतात आलेली सीमी सध्या चांगलीच चर्चेत आहे. पण प्रश्न असा आहे की नेपाळ बॉर्डरमागे इतक्या सहज भारतात प्रवेश करता येतो का? अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेने केलेल्या एका अहवालानुसार नेपाळची सीमा भारतात प्रवेश करण्यासाठी गुप्तचरांचा सर्वात आवडता मार्ग आहे. काही दिवसांपूर्वी खलिस्तानी अमृतपाल गायब झाला होता. त्यावेळी तो नेपाळमध्ये लपल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. अनेक दहशतवादी संघटांनां भारतात गुन्हेगारी कारवाया करायच्या आहेत. यातले जवळपपास सर्वच दहशतवादी भारतात येण्या-जाण्यासाठी नेपार सीमेचा वापर करतात.
भारत आणि नेपाळमध्ये अठराशे किलोमीटरची सीमा आहे. भारत-नेपाळ सीमेवर उत्तराखंड, बिहार, पश्चिम बंगाल आणि सिक्किम ही राज्य येतात. यातला मोठा भाग हा ओपन बॉर्डर म्हणून घोषित करण्यात आला आहे. विश्वासार्हतेच्या मुद्द्यावर हा करार करण्यात आला. या भागात इतर भागांप्रमाणे कडक सुरक्षा व्यवस्था नसते. इतकंच नाही या रस्त्यावर काटेरी तारांचं कुंपनही टाकण्यात आलेलं नाही. याला शांतता आणि मैत्रीचा करार असं नाव देण्यात आलं आहे.
भारत आणि नेपाळमध्ये सलोख्याचे आणि सांस्कृतिक संबंध आहेत. दोन्ही देशांमध्ये रोटी-बेटीचं नातं आहे. दोन्ही देशातील नागरिकांची ये-जा सुरु असते. हे नातं कायम राहावं यासाठी 1950 साली ओपन बॉर्डर करण्यात आली. पाकिस्तानी महिला सीमा हैदर याच मार्गाने आपल्या प्रियकराला भेटण्यासाठी भआरतात आली.
ओपन बॉर्डर बनलाय धोक्याचा मार्ग
भारत-नेपाळ ओपन बॉर्डर हा धोक्याचा मार्ग बनलाय. याच मार्गाने मोठ्याप्रमाणावर मानव तस्करी, बनावट नोटांची तस्करी होत असल्याचंही समोर आलं आहे. या मार्गाचा सर्वात मोठा गैरवापर होतो तो म्हणजे दुसऱ्या देशांचे गुप्तचर आणि दहशतवाद्यांकडून. नेपाळचा यात कोणताही हात नाही. पण दोन्ही देशांमध्ये इतकी मोठी ओपन बॉर्डर असल्याने त्याचा फायदा गैरमार्गासाठी केला जातो. या मार्गाचा सर्वात जास्त गैरवापर पाकिस्तानकडून केला जात असल्याचंही समोर आलं आहे. पाकिस्तानच्या दहशतवादी संघटना इंडियन मुजाहिद्दीन, लष्कर ए तोयबाब, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी या मार्गाने लपूनछपून किंवा ओळख बदलून भारतात प्रवेश करतात.
काठमांडू विमानतळावर कमी सुरक्षा
भारत-नेपाळ ओपन बॉर्डर हा एकमेव मुद्दा नाहीए. तर अमेरिकन सुरक्षा विभागाने दिलेल्या अहवालानुसार काठमांडूमधल्या त्रिभूवन विमानतळावरची सुरक्षाही खूप कमकुवत आहे. हे देशातील एकमेव आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. या विमानतळावर प्रवाशांचा डेटा नीट ठेवला जात नाही, तसंच प्रवाशांची कागदपत्र तपासण्यासाठी अल्ट्रावायलेट लाईट्सही नाहीत, असंही या अहवालात नमुद करण्यात आलंय. अशात बोगस पासपोर्ट बनवून या ठिकाणाहून सहज भारतात प्रवेश केला जाऊ शकतो.
पाकिस्तानच्या कुटिल कारवाया
ऐंशीच्या दशकापासून भारतात घुसखोरी करण्यासाठी पाकिस्तान नेपळचा वापर करत आहे. भारतीय सुरक्षा यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार RDX सारखी स्फोटकं आधी नेपाळ आणि तिथून भारतात पाठवली जातात. काही वेळा नेपाळ सुरक्षा दलाने दहशतदवाद्यांना स्फोटकांसह रंगे हात पकडलं आहे. पाकिस्तानात बनवाट नोटा बनवून त्या नेपाळमार्गे भारतात पाठवल्या जात असल्याचंही अनेकवेळा सिद्ध झालं आहे.
भारत-नेपाळदरम्यान प्रवास करण्यासाठी पासपोर्टची गरज भासत नाही. पण एक परमिट लागतं, त्याला भंसार परमिट असं म्हटलं जातं. बाईक किंवा कारने बॉर्डर क्रॉस करायची असल्यास हे परमिट लागतं. पण अनेकवेळा लोकं सुरक्षा जवानांना चकवा देत प्रवास करतात. बस, ट्रेन, फ्लाईट किंवा टॅक्सीने भारत-नेपाळ बॉर्डर पार करायची असल्यास परमिटची गरज लागत नाही.