"दुर्दैवाने ती स्त्री होती...," श्रद्धा वालकरचं पत्र वाचून कंगना राणौत भावूक

Shraddha murder case : बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत (Kangana Ranaut) श्रद्धाचं 2020 सालात पत्र वाचून भावुक झाली आहे. कंगनाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर श्रद्धाचे पत्र शेअर करत एक नोट लिहिली आहे. 

Updated: Nov 24, 2022, 03:41 PM IST
"दुर्दैवाने ती स्त्री होती...," श्रद्धा वालकरचं पत्र वाचून कंगना राणौत भावूक title=
Kangana Ranaut on Shraddha Walker murder case

Shraddha Walker murder case: दिल्लीतील श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणानंतर (Shraddha murder case) संपूर्ण देश हादरला आहे. असे असताना, ‘आफताब माझा खून करेल आणि माझे तुकडे करून मला फेकून देईल,’ अशा आशयाचे श्रद्धा वालकरने २०२० साली पोलिसांना लिहिलेले पत्र समोर आले आहे. या पत्राच्या आधारे नालासोपारा येथील तुळींज पोलिसांनी दोन वेळा श्रद्धाचा जबाब घेतला होता. मात्र आपण रागाच्या भरात तक्रार केली होती, आता वाद मिटल्याचे श्रद्धाने सांगितल्याने पोलिसांनी प्रकरण निकाली काढल्याचे स्पष्ट झाले आहे. याचदरम्यान बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत (Kangana Ranaut) श्रद्धाचं 2020 सालात पत्र वाचून भावुक झाली आहे. कंगनाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर श्रद्धाचे पत्र शेअर करत एक नोट लिहिली आहे. 

कंगनाने शेअर केले श्रद्धाचे पत्र 

श्रद्धाची चिठ्ठी वाचल्यानंतर कंगना खूप दुखावली गेली आहे. श्रद्धाच्या पत्राचा फोटो शेअर करत त्यांनी लिहिले की, 'हे 2020  मध्ये पोलिसांच्या मदतीसाठी श्रद्धाने लिहिलेले पत्र आहे. तो तिला नेहमी घाबरवायचा आणि तिचे तुकडे करण्याची धमकी द्यायचा. त्याने लिहिले आहे की, तो तिला ब्लॅकमेल करत असे पण त्याने तिचे ब्रेनवॉश कसे केले आणि तिला आपल्यासोबत दिल्लीला नेले हे तिला कळले नाही. त्याने तिला जगापासून वेगळे केले आणि एका काल्पनिक जगात नेले.  

'आपल्या सर्वांना माहित आहे की हे 'लग्नाचे वचन देऊन' केले होते. ती कमजोर नव्हती. ती एक मुलगी होती, या जगात जगण्यासाठी जन्माला आली होती पण दुर्दैवाने तिच्या आत एक स्त्रीचे मन होते, ज्याची नैसर्गिक प्रवृत्ती संरक्षण आणि जखम भरून काढण्याचे होते. आपल्या पृथ्वीप्रमाणेच स्त्रीलाही असा गर्भ आहे, जो कोणाशीही भेदभाव करत नाही. ती त्या सर्वांना दत्तक घेते, मग ते पात्र असो वा नसो. 

'ती परीकथांवर विश्वास ठेवायची. तिला विश्वास होता की जगाला तिच्या प्रेमाची गरज आहे. ती देवी होती जिच्यात जखमा बरे करण्याचे सामर्थ्य होते. ती कमकुवत नव्हती, ती एक परीकथेत राहणारी मुलगी होती. ती परीकथेतील तिच्या नायकामध्ये लपलेल्या राक्षसांशी लढण्याचा प्रयत्न करत होती. आपल्या सर्वांना माहित आहे की प्रेम आपल्याला व्यापून टाकते. तिने राक्षसांना मारण्यासाठी खूप प्रयत्न केले पण राक्षस जिंकला आणि तेच झाले...' कंगनाची ही लांबलचक पोस्ट सांगते की तिला या प्रकरणाचा खूप राग आहे आणि ती श्रद्धाची मानसिक स्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे.  

कंगना दुखावली 

कंगना राणौत अशी अभिनेत्री आहे, जी उघडपणे बोलते आणि जवळपास प्रत्येक मुद्द्यावर आवाज उठवते. कंगनाची ही लांबलचक पोस्ट सांगते की तिला या प्रकरणाचा खूप राग आहे आणि ती श्रद्धाची मानसिक स्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे.