1 जूनपासून कोणते नियम बदलणार? पाहा कशी लागणार तुमच्या खिशाला कात्री

1 जूनपासून 5 मोठे बदल, पाहा तुमच्या आयुष्यावर काय होणार परिणाम

Updated: May 28, 2022, 12:45 PM IST
1 जूनपासून कोणते नियम बदलणार? पाहा कशी लागणार तुमच्या खिशाला कात्री  title=

मुंबई : मे महिना संपण्यासाठी बोटावर मोजण्याएवढे दिवस शिल्लक आहेत. 1 जूनपासून काही बदल होणार आहेत. हे बदल तुमच्या आयुष्यावर खास परिणाम करणारे असतील. त्याचा थेट परिणाम आपल्या आर्थिक गणितावर होऊ शकतो. 1 जूनपासून पाच मोठे बदल होणार आहेत. याचा परिणाम थेट आपल्या आयुष्यावर होणार आहेत.कोणते नियम बदलणार आहेत जाणून घेऊया. 

SBI व्याजात वाढ
SBI ने होम लोनचं EBLR वाढवून 7.05 टक्के केलं आहे. ज्यामुळे तुम्हाला त्याचा मोठा फटका बसणार आहे. हे आधी 6.65 टक्के होतं. मात्र आता हे वाढवून 7.05 टक्के करण्यात आलं आहे. हा नियम 1 जूनपासून लागू होणार आहे. त्यामुळे होम लोनसाठी ग्राहकांना जास्तीचे पैसे भरावे लागणार आहेत. 

थर्ड पार्टी इन्शुरन्स प्रीमियम
खासगी गाड्यांसाठी थर्ड पार्टी इन्शुरन्स पूर्वीपेक्षा थोडा महागणार आहे. 2019-20 मध्ये, हा इन्शुरन्स 2072 रुपयांचा होता, तो वाढवून 2094 रुपये करण्यात आला. 1000 cc च्या खाली असलेल्या कारसाठी आहे. 1000 ते 1500 cc कारसाठी थर्ड पार्टी इन्शुरन्स 3221 रुपयांवरून 3416 रुपयांपर्यंत वाढवण्यात आला आहे. 

1500 cc पेक्षा जास्त क्षमतेच्या वाहनांसाठी थर्ड पार्टी इन्शुरन्स 7890 रुपयांवरून 7897 रुपये करण्यात आला आहे. 150 ते 350 ccच्या दुचाकीसाठी इन्शुरन्स प्रीमियम 1366 रुपये असेल तर 350 cc पेक्षा जास्त क्षमतेच्या बाईकसाठी 2804 रुपये भरावे लागणार आहेत. 

गोल्ड हॉलमार्क
जून 2022 पासून होलमार्किंगचा दुसरा टप्पा सुरू होत आहे. 32 जिल्ह्यांमध्ये होलमार्किंग अनिवार्य करण्यात आलं आहे. 288 जिल्ह्यांमध्ये 14, 18, 20, 22, 23 आणि 24 कॅरेज सोन्याचे दागिने तयार केले जाणार आहेत. या सगळ्या दागिन्यांना होलमार्क असणं बंधनकारक असणार आहे. 

पोस्ट पेमेंटवर जास्तीचा चार्ज 
पोस्ट ऑफिसमध्ये आता फ्री लिमिटनंतर पुढच्या ट्रान्झॅक्शनसाठी सेवा चार्ज आकारण्यात आला आहे. सेवा चार्ज लावण्याचा नियम 15 जूनपासून लागू होणार आहे. 

इंडिया पोस्ट पेमेंट बँक ही पोस्ट विभागाद्वारे चालवली जाते. AEPS मधून एका महिन्यात तीन व्यवहार करत येणार आहेत. मात्र त्यानंतरचे व्यवहार करणाऱ्यांना जादा पैसे द्यावे लागणार आहेत. पैसे काढणे किंवा मर्यादेपेक्षा जास्त रक्कम जमा केल्यावर 20 रुपये अधिक जीएसटी आणि मिनी स्टेटमेंटसाठी रुपये 5 अधिक जीएसटी भरावा लागणार आहे. 

बचत खात्यावरची रक्कम 15 हजार रुपयांवरून 25 हजार रुपयांवर वाढवण्यात आली आहे. एक्सिस बँकेच्या बचत खात्यावरील चार्जेस वाढवण्यात आले आहेत.