नवी दिल्ली : एका मुलीचा विनयभंग करून व्हिडिओ बनवल्याची घटना समोर आली आहे. काही लोकांनी 21 वर्षीय तरुणीच्या घरात घुसून तिचा विनयभंग केला आणि आंघोळ करतानाचा व्हिडिओ बनवला, असा आरोप आहे.
याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून दोन संशयितांना अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी शुक्रवारी सांगितले. महिलेने तक्रारीत म्हटले आहे की, ती मूळची हरियाणातील भिवानी जिल्ह्यातील असून गुरुग्राममध्ये भाड्याच्या घरात राहते. तसेच एका खासगी कंपनीत काम करते.
तरुणीने तक्रारीत म्हटले आहे की, गुरुवारी मी माझ्या खोलीत असताना शेजारी राहणारे पाच तरुण अचानक घुसले. माझ्या खोलीत त्याच्या मित्राच्या वाढदिवसाची पार्टी करू देण्याची त्यांनी विनंती केली. आधी मी नकार दिला पण नंतर हो म्हणाले.
तरुणीच्या म्हणण्यानुसार, पार्टीदरम्यान मला फोन आला आणि मी बोलण्यासाठी बाहेर पडले. थोडा वेळाने घरात परत आल्यानंतर मी आंघोळीसाठी गेले होते. यादरम्यान त्यांनी माझा लपून व्हिडिओ तर बनवलाच पण नंतर माझा विनयभंगही केला. मी आरडाओरडा केल्यावर ते पळून गेले." बिलासपूर पोलिसांनी एफआयआर नोंदवून दोन संशयितांना अटक केली आहे.