नवी दिल्ली : दिल्ली मेट्रो कॉरपोरेशन (DMRC)मध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. मात्र अर्ज करण्यासाठी शेवटचे 3 दिवस बाकी आहेत. त्यामुळे तुम्हीही नोकरीच्या शोधात असाल तर इच्छुकांनी लवकर आवेदन करावे. त्यासाठी शेवटची तारीख 26 फेब्रुवारी आहे. दिल्ली मेट्रोच्या अधिकृत वेबसाईटवर तुम्ही अर्ज करु शकता.
येथे करा अर्ज
अर्ज करण्यासाठी दिल्ली मेट्रोच्या अधिकृत वेबसाईवर www.delhimetrorail.com लॉग ऑन करून तुम्ही फॉर्म भरू शकता.
अर्ज करण्यासाठी या आहेत अटी
आवेदन करण्यासाठी 1 जानेवारी 2018 पर्यंत वय 18 ते 28 वर्ष असायला हवे. इंजिनियरिंगमध्ये असिस्टेंट मॅनेजर पदासाठी उमेदवाराने GATE 2017 ही परीक्षा पास करणे गरजेचे आहे. बाकी पदांसाठी मान्यताप्राप्त युनिवर्सिटीतून MBA ची पदवी असणे अनिवार्य आहे. अर्ज करण्यापूर्वी नियम आणि अटी जरूर वाचा.
निवड प्रक्रिया
उमेदवारांची निवड कम्प्यूटर बेस टेस्ट च्या आधारावर होईल. एझ्जिक्युटिव्ह पदांसाठी तीन प्रक्रियेतून जावे लागेल. ज्यात दोन कम्प्यूटर बेस टेस्ट, ग्रुप डिस्कशन, आणि मुलाखत असेल. त्याचबरोबर मेडिकल टेस्टही करावी लागेल. नॉने एझ्जिक्युटिव्ह पदांसाठी निवडीच्या दोन प्रक्रिया आहेत. यात कम्प्यूटर टेस्ट आणि मेडिकल एक्झाम होईल.
कोणत्या पदांसाठी आहेत जागा
एझ्जिक्युटिव्ह कॅटेगरीमध्ये वेगवेगळे फिल्ड आहेत. असिस्टेंट मॅनेजर आणि नॉन-एझ्जिक्युटिव्ह कॅटेगरीमध्ये ज्युनिअर इंजिनीयर, असिस्टेंट प्रोग्रामर, लीगल असिस्टेंट, फायर इंस्पेक्टर, लायब्रेरियन, ऑफिस असिस्टेंट, स्टोर असिस्टेंट पदांसाठी उमेदवारांची निवड करण्यात येईल.
कसा कराल अर्ज
इच्छुकांनी अर्ज करण्यासाठी delhimetrorail.com/Career.aspx या वेबसाईटवरून जावून आवेदन करा.
वयोमर्यादा
18-28
अर्ज करण्याची अंतिम तारीख
26 फेब्रुवारी 2018