एअर इंडियाच्या फ्लाईटमध्ये प्रवाशांना खास सरप्राईज मिळाले.
Darshana PawarDarshana Pawar | Updated: Feb 23, 2018, 04:39 PM IST
नवी दिल्ली : एअर इंडियाच्या फ्लाईटमध्ये प्रवाशांना खास सरप्राईज मिळाले. फ्लाईट टेक ऑफ होत असताना ढोल वाजवून प्रवाशांचे मनोरंजन करण्यात आले. ढोलसोबत गायलेले पंजाबी गाणे लोकांनी खूप एन्जॉय केले. लोकांनी याचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर शेअर देखील केला. फेसबुक पेज ढोल ब्लास्टर्स वर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला. व्हिडिओ शेअर होताच व्हायरल झाला. लोकांनी यावर जबरदस्त कमेंट्स दिल्या.
लोकांना मिळाले सरप्राईज
मिळालेल्या माहितीनुसार, 8 वर्षांनंतर एअर इंडियाने अमृतसर आणि बर्मिंघमसाठी नॉन स्टॉप फ्लाईट सुरू केली. इतक्या वर्षांनंतर पुन्हा एकदा फ्लाईट टेक ऑफसाठी सज्ज झाली. यामुळे प्रवाशांना मस्त सरप्राईज मिळाले. सीटवर पंजाबी वेशभूषेत ढोल घेऊन लोक बसले होते. पंजाबी गाणे सुरू होताच ढोल वाजवायला सुरूवात झाली. हे सरप्राईज पाहुन लोकांच्या चेहऱ्यावर हास्य उमटले. टाळ्या वाजवून लोकांनी कलाकारांना प्रोत्साहन दिले. यावेळी या कलाप्रदर्शनाचे प्रवाशांनी आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्डींग करण्यात आले.
पंजाब आणि युके थेट प्लाईट
ढोल ब्लास्टर्स या फेसबुक पेजवर हा व्हिडिओ बुधवारी पोस्ट करण्यात आला. हा व्हिडिओ आतापर्यंत 16 हजाराहुन अधिक लोकांनी पाहिला आहे. त्याचबरोबर हा व्हिडिओ हजारो लाईक्स आणि शेअरर्सचा धनी झाला आहे.
पंजाब ते युके असा थेट प्रवास करणारी ही एकच फ्लाईट आहे. ही फ्लाईट आठवड्यातून दोनदा मंगळवार आणि गुरूवारी उड्डाण करेल. उडान ए. आय. 117 दिल्लीहुन सकाळी 11.20 वाजता टेक ऑफ होईल आणि दुपारी 12.25 वाजता अमृतसर पोहचेल. दुपारी 1.55 मिनीटांनी अमृतसरहुन टेक ऑफ करेल आणि बर्मिघमला स्थानिक वेळ संध्याकाळी 5.15 वाजता पोहचेल.
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.