Job 2022 : परीक्षेशिवाय आता नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी, ही संधी हातून घालवू नका

Job 2022 : परीक्षा न देता नोकरी मिळवण्याची संधी, पाहा किती असणार पगार आणि कसा करायचा अर्ज

Updated: Mar 7, 2022, 08:05 PM IST
Job 2022 : परीक्षेशिवाय आता नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी, ही संधी हातून घालवू नका title=

नवी दिल्ली : नोकरीच्या शोधात असणाऱ्या किंवा नोकरी बदलणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. केंद्रीय विद्यालयामध्ये नोकरीच्या जागा आहे. या जागांवर अर्ज करणाऱ्या इच्छुक उमेदवारांना परीक्षा द्यावी लागणार नाही. तर पगारही चांगला असणार आहे.

केंद्रीय विद्यालयामध्ये नोकरीची संधी आहे. यासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज करायचा आहे. शिक्षक आणि कर्मचारीपदासाठी अर्ज करता येणार आहे. इथे तुमचं मुलाखतीमधून निवड करण्यात येणार आहे. 

KSV विद्यालयाने पीआरटी, टीजीटी, पीजीटी, योग शिक्षक, क्रीडा शिक्षक, नृत्य / संगीत शिक्षक, विशेष शिक्षक, कंप्यूटर प्रशिक्षक, नर्स, डॉक्टर, डीईओ आणि क्लर्कसारख्या अनेक पदांसाठी रिक्त जागा भरण्याबाबत जाहिरात दिली आहे. यासाठी मुलाखतीचं आयोजन करण्यात आलं असून त्यातून इच्छुक उमेदवारांची निवड केली जाणार आहे. 

असा करू शकता ऑनलाइन अर्ज

ज्यांना या विद्यालयात नोकरीसाठी अर्ज करायचा आहे त्या इच्छुक उमेदवारांनी raisen.kvs.ac.in या वेबसाईटला भेट द्या. तिथे KVS भर्ती 2022वर क्लिक करा. इच्छुक उमेदवार नियोजित तारखेला आणि वेळेत केंद्रीय विद्यालय शाखेत मुलाखतीला जाऊ शकतात.

मुलाखतीपूर्वी उमेदवारांना शाळेच्या वेबसाइटवरून अर्ज डाउनलोड करावा लागेल आणि मुलाखतीच्या दिवशी सर्व प्रमाणपत्रे आणि प्रशस्तिपत्रकासह तो सबमिट करावा लागणार आहे. त्यामुळे अत्यावश्यक कागदपत्रांची झेरॉक्स कॉपी देखील ठेवा. 

PRT साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना 12 वी पास असणं आवश्यक आहे. यासोबत बेसिक टीचिंग ट्रेनिंग आणि डिप्लोमा, एलिमेंट्री एज्युकेशन आवश्यक आहे. या जागेवर अर्ज करणाऱ्या उमेदवारांना  26250/ रुपये वेतन मिळणार आहे. 
PGT – या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना बीएड त्या विषयात असणं गरजेचं आहे. याशिवाय पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण हवं. यापदासाठी 32,500 रुपये वेतन मिळणार आहे. 
TGT – या पदासाठी अर्ज करणारे उमेदवार 50 टक्क्यांनी ग्रॅज्युएट पास असणं आवश्यक आहे. याशिवाय डीएड डिग्री असायला हवी. CTET क्वालिफाय असणाऱ्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. 31250 रुपये वेतन मिळणार आहे.