Lalu Yadav यांना शिक्षा सुनावणारे न्यायाधिश 64 व्या वर्षी पडले प्रेमात, भाजपा महिल्या नेत्याशी लग्न

कोर्ट परिसरात न्यायाधीश आणि तिची ओळख झाली आणि दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला

Updated: Sep 5, 2022, 09:09 PM IST
Lalu Yadav यांना शिक्षा सुनावणारे न्यायाधिश 64 व्या वर्षी पडले प्रेमात, भाजपा महिल्या नेत्याशी लग्न title=

Lalu Yadav : चारा घोटाळ्यात राजदचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांना शिक्षा सुनावणारे गोड्डा कोर्टाचे न्यायाधिश शिवपाल सिंह (Shivpal Singh) पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. लालू प्रसाद यांना तुरुंगात पाठवणारे न्यायाधिश शिवपालसिंह प्रेमात पडले आहेत. 64 वर्षांच्या शिवपाल सिंह यांना गोड्डा कोर्टाच्या एका महिला वकिलाशी प्रीत जडली आहे. या दोघांनी लग्नही केलं आहे. गोड्डा कोर्टात प्रॅक्टिस करणाऱ्या नूतन तिवारी (Nutan Tiwari) या भाजपच्या नेत्याही आहेत. (jharkhand judge shivpal singh married femal lawyer)

हिंदू पद्धतीने लग्न
न्यायाधीश शिवपाल सिंह यांनी कारकिर्दीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. पण आपल्या लग्नाचा निर्णय घेण्यासाठी त्यांना 64 वर्षापर्यंत वाट पाहावी लागली. 64 वर्षांचे शिवपाल सिंह यांनी 50 वर्षांच्या प्रेयसी नूतन तिवारी यांच्याशी लग्न केलं. हिंदू पद्धतीने हा विवाहसोहळा संपन्न झाला. न्यायाधीश शिवपाल सिंह यांनी हा आपला वैयक्तिक निर्णय असल्याचं सांगितलं असून दोघंही या निर्णयाने आनंदी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. 

गोड्डा कोर्ट परिसरात पहिली ओळख
न्यायाधीश शिवपाल आणि नूतन तिवारी यांची पहिली ओळख गोड्डा कोर्ट परिसरात झाली. दोघांची ओळख झाली आणि त्यानंतर त्यांची मैत्री झाली. भेटीगाठी वाढत गेल्या आणि पुढे मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. अखेर त्यांनी आयुष्य एकत्र घालवण्याचा निर्णय घेतला. 

लालूप्रसाद यादव यांना सुनावली होती शिक्षा
चारा घोटाळा संबंधीतल्या प्रकरणाची सुनावणी न्यायाधीश शिवपाल सिंह यांनी केली होती. शिवपाल सिंह त्यावेळी सीबीआई विशेष न्यायालयाचे न्यायाधिश होते. सुनावणी दरम्यान लालूप्रसाद यादव आणि न्यायाधीश शिवपाल सिंह यांच्यात त्यावेळी झालेली एक बातचीत चांगलीच चर्चेत आली होती. लालूप्रसाद यादव यांनी तुरुंगात थंडी वाजत असल्याचं शिवपाल सिंह यांना सांगितलं. यावेळी शिवपाल यांनी लालूप्रसाद यांना तुरुंगात तबला आणि हार्मोनिय वाजवा आणि तणावमुक्त रहा असा सल्ला दिला होता.