तरुणांनो तयार व्हा.. Jet Airways मध्ये सप्टेंबरमध्ये होतीये मोठी नोकरभरती... जाणून घ्या सर्व माहिती

Jet Airways Pilot recruitment : जेट एअरवेज येत्या सप्टेंबरमध्ये कमर्शिअल भरारी घेण्याच्या तयारीत आहे. म्हणूनच, कंपनी 'पायलट' पदासाठी मोठी नोकरभरती करणार आहे.

Updated: Aug 8, 2022, 10:10 AM IST
तरुणांनो तयार व्हा.. Jet Airways मध्ये सप्टेंबरमध्ये होतीये मोठी नोकरभरती... जाणून घ्या सर्व माहिती title=

Jet Airways Pilot Recruitment : भारताच्या एविएशन इंडस्ट्रीमध्ये लवकरच नवे प्लेअर्स एंट्री करणार आहे. यापैकी पहिलं नाव म्हणजे शेअर मार्केटचे बिग बुल राकेश झुनझुनवालाच्या (Rakesh Jhunjhunwala) मालकीची 'अकासा एअर' (Akasa Air) तर दुसरं नाव 'जेट एअरवेज' (Jet Airways) या कंपनीचं आहे. पुढच्या महिन्यात अकासा एअर कंपनीची कमर्शिअल सर्विस सुरु होणारा आहे. जेट एअरवेजने देखील सप्टेंबरमहिन्यातच आपलं ऑपरेशन सुरु करण्याचं जाहीर केलं आहे. या ऑपरेशनच्या अनुषंगाने जेट एअरवेजने प्लायलट पदासाठी नोकर भरती सुरु केली आहे. सोशल मीडिया एक पोस्ट शेअर करुन जेट एअरवेजने पायलट पदांच्या नोकर भरतीची घोषणा केली आहे.

डीजीसीएने दिली मंजूरी

मंगळवारी, जेट एअरवेज कंपनीने Airbus A320 विमानांसोबतच Boeing 737NG आणि 737Max विमानांच्या पायलट पदासाठी नोकर भर्ती सुरु केली आहे. जेट एअरवेज कंपनीला 20 मे ला एविएशन रेगुलेटर DGCA कडून एअर ऑपरेटर सर्टिफिकेट मिळालं आहे. यूरोपिअन प्लेनमेकर एअरबस (Airbus) किंवा अमेरिक एअरोस्पेस कंपनी बोइंग (Boeing) कंपनीला विमानांची ऑर्डर दिली आहे.

जेट एअरवेजने मागवले अर्ज

जेट एअरवेजने (Jet Airways) ट्विटमध्ये असं लिहिलंय की, जे लोक वाट पाहतात त्यांच्या वाट्याला चांगल्या गोष्टी येतात. जेट एअरवेज लवकरच पुन्हा भरारी घेणार आहे. आम्ही अशा पायलटांना आमंत्रित करत आहोत, जे Airbus A320 किंवा Boeing 737NG किंवा MAX मध्ये करेंट अथवा टाइप रेटेड पायलट असतील. आमच्यासोबत इतिहास रचाण्यासाठी अप्लाय करा. कारण, भारताची सर्वोत्तम एअरलाईनला पुन्हा एकदा लाँच करण्यासाठी तयारी करते आहे.

सप्टेंबरपासून सुरु होईल भरारी...

सध्या जेट एअरवेजकडे (Jet Airways) B737NG नावाचं केवळ एकच ऑपरेशनल एअरक्राफ्ट आहे. सप्टेंबरमध्ये संपनाऱ्या तिमाहीत आपली कमर्शिअल भरारी घेण्याचा कंपनीचा विचार आहे.